फ्रीडम टू वॉकमध्ये कल्याण-डोंबिवली देशात सर्वप्रथम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 05:23 PM2022-02-18T17:23:59+5:302022-02-18T17:28:37+5:30

1 जानेवारी  ते 26 जानेवारी 2022 या दरम्यान झालेल्या स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती.

Kalyan-Dombivali first in the country in Freedom to Walk | फ्रीडम टू वॉकमध्ये कल्याण-डोंबिवली देशात सर्वप्रथम

फ्रीडम टू वॉकमध्ये कल्याण-डोंबिवली देशात सर्वप्रथम

googlenewsNext

कल्याण - भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारने राबविलेल्या फ्रीडम टू वॉक या स्पर्धेत भारतातील काही स्मार्ट सिटीजने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कल्याणडोंबिवली महापालिकाने देशपातळीवर सर्वप्रथम आली आहे. 1 जानेवारी  ते 26 जानेवारी 2022 या दरम्यान झालेल्या स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती. काल सायंकाळी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेअंती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने राष्ट्रीय स्तरावर सर्वप्रथम ठरली आली आहे. 

स्पर्धेमध्ये व्यक्तिगत स्तरावर महापालिका आयुक्त सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत, नगर सचिव संजय जाधव आणि उप अभियंता अजित देसाई सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विविध कॅटेगरीमध्ये अधिकारी वर्गास चांगले यश मिळाले आहे महिला कॅटेगरीमध्ये महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. आयुक्त कॅटेगरीमध्ये संपूर्ण देशपातळीवर महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांना चौथा क्रमांक प्राप्त झाला असून व्यक्तिगत कॅटेगरीमध्ये पल्लवी भागवत सहाव्या क्रमांकावर तर महापालिका सचिव संजय जाधव आठव्या क्रमांकावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार अकराव्या क्रमांकावर आणि महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उबाळे चौदाव्या क्रमांकावर तर महापालिकेचे उपअभियंता देसाई नवव्या क्रमांकावर आले आहेत.

स्पर्धेसाठी महापालिकेची टीम शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर धावण्याचा सराव करत असताना नागरिकांनी देखील त्यांचे समवेत धावत उस्फूर्त प्रतिसाद दिला. आयुक्त सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेस देशपातळीवर  प्राप्त झालेल्या कोविड इनोव्हेशन पुरस्कार, ऊर्जा संवर्धन पुरस्कार, या पुरस्कारांच्या दैदीप्यमान यशानंतर आज फिटनेसचे महत्त्व जाणवून देणार्या फ्रीडम टू वॉक या स्पर्धेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे महापालिकेची मान अभिमानाने अधिक उंचावली आहे.
 

Web Title: Kalyan-Dombivali first in the country in Freedom to Walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.