27 गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरसेवकासह संतप्त नागरिकांनी पेटवला कचरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:22 PM2021-08-03T15:22:24+5:302021-08-03T15:24:37+5:30

Kalyan Dombivali Garbage Disposal Issue : कल्याण नजीक असलेल्या नांदीवली परिसरात संतप्त नागरिकांनी साचलेला कचरा पेटवून देत आपला संताप व्यक्त केला आहे.

Kalyan Dombivali Garbage Disposal Issue in 27 Village | 27 गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरसेवकासह संतप्त नागरिकांनी पेटवला कचरा 

27 गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरसेवकासह संतप्त नागरिकांनी पेटवला कचरा 

googlenewsNext

कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत कचऱ्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. 27 गावात देखील कचरा उचलला जात नसल्यानं घाणीच साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे कल्याण नजीक असलेल्या नांदीवली परिसरात संतप्त नागरिकांनी साचलेला कचरा पेटवून देत आपला संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने दखल घेतली नाही तर यापुढे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला.

कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात वारंवार केडीएमसी प्रशासनाला सांगून सुद्धा काही उपयोग झाला नाही. नागरीकांच्या कचऱ्यावरून तक्रारी येतायेत. त्यांना काय उत्तर द्यायचे? असा प्रश्न  स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या  27 गावांपैकी 18 गावे पालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारन घेतला. 

9 गाव पालिकेतच आहेत. गाव वगळण्याचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात या गावांबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातो ते पाहावं लागेल. तसेच येथील कचऱ्याच्या प्रश्न ही पेटण्याची चिन्ह निर्माण झालीत. 

Web Title: Kalyan Dombivali Garbage Disposal Issue in 27 Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.