कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केले  मॉडेल 

By अनिकेत घमंडी | Published: October 23, 2023 03:54 PM2023-10-23T15:54:53+5:302023-10-23T15:55:36+5:30

राज्यातला प्रथम पायलट प्रोजेक्ट 

Kalyan Dombivli Municipal Corporation prepared a model for construction of transformers in the city | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केले  मॉडेल 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी तयार केले  मॉडेल 

डोंबिवली:  महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली परिसरात शहरसौंदर्यीकरणा अंतर्गत विविध उपक्रम सुरु आहेत.

शहरातील वीज महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर, उपरित तार मार्ग वाहिनी (ओव्हरहेड लाईन्स) स्वरुपात असून त्यासाठी मोठया प्रमाणात जागा लागत असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणात त्यामुळे बाधा येत आहे. तसेच उपरित तार मार्ग वाहिनी स्वरुपात असलेले ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरपेक्षा नविन मॉडेल हे नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य आहे. महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील सिंगल ट्रान्सफॉर्मर व डबल ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारणीसाठी सुंदर मॉडेल तयार करुन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मुख्य विद्युत निरीक्षक यांचेकडे सादर केले होते. सदर मॉडेल उभारणीमुळे (शहरातील उपरित तारमार्ग वाहिनी स्वरुपात असलेले ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर ऐवजी) शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याने असे ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे.

डोंबिवली (पश्चिम) सखाराम नगर येथे रस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेले उपरित तारमार्ग वाहिनी स्वरुपात असलेले डबल ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर काढून नविन भूमीगत सुंदर मॉडेल पध्दतीने ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारण्याचे काम पायलट प्रोजेक्ट स्वरुपात महापालिकेने पूर्ण केलेले आहे. सदर पायलट प्रोजेक्टची यशस्वी उभारणी करण्याच्या कामात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कल्याण येथील अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावरील उपरित तारमार्ग वाहिनी स्वरुपात असलेले ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चरऐवजी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे व नागरीकांसाठी सुरक्षित असलेल्या नविन मॉडेल पध्दतीने ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर करून नविन सुंदर मॉडेल पध्दतीचे ट्रान्सफॉर्मर स्ट्रक्चर उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

Web Title: Kalyan Dombivli Municipal Corporation prepared a model for construction of transformers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.