Kalyan Dombivli Rain: कल्याण डोंबिवलीत  387.8 मिमी पावसाची नोंद; पालिकेकडून अनेक नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 06:19 PM2021-07-19T18:19:49+5:302021-07-19T18:23:19+5:30

Rain in Kalyan Dombivli: गेल्या 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचले होते.

Kalyan Dombivli Rain: 387.8 mm rainfall recorded in Kalyan Dombivali | Kalyan Dombivli Rain: कल्याण डोंबिवलीत  387.8 मिमी पावसाची नोंद; पालिकेकडून अनेक नागरिकांचे स्थलांतर

Kalyan Dombivli Rain: कल्याण डोंबिवलीत  387.8 मिमी पावसाची नोंद; पालिकेकडून अनेक नागरिकांचे स्थलांतर

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क  

कल्याण : गेल्या 2 दिवसांपासून कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आज दुपारी 3 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात 387.8 मीमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचले होते. (Heavy rain in Kalyan Dombivali.)

 अ प्रभागातील बल्याणी रोड खचल्यामुळे काल रात्री बल्याणी मधील काही घरात पाणी शिरले होते. सदर परिसरात 900 मीटरचे 6 नविन पाईप बसविल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यात आला. तेथील परिसरात सकाळी सुमारे 1000 फुड पॅकेटचे वितरण करण्यात आल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले आहे.  महापालिकेच्या जे प्रभागतही वालधुनी नदीच्या पुराचे पाणी परिसरात गेल्यामुळे तेथील लोकांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत होणेबाबत विनंती केडीएमसीकडून करण्यात आली आहे. ओम टॉवर, वालधुनी येथील पावसाचे साचलेले पाणी जेसीबीच्या मदतीने काढून पाण्याचा निचरा करण्यात आला. 

       ई प्रभागात कोळे गावात सखल भागात अतिवृष्टीमुळे पाणी साचल्याने कुटूंबाची नजीकच्या शाळेत व्यवस्था करण्यात आली . या ठिकाणी देखील आज दुपारी 100 फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. महापालिकेच्या ह प्रभागतही कोपर नाल्याजवळील अण्णा नगर वसाहती पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांना जनगण‍मन शाळेत स्थलांतरीत करण्यात आले . तेथे आज 50 फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जुनी डोंबिवली येथे कोपर रेल्वे ब्रिज जवळ पाणी शिरल्यामुळे सदर वसाहतीतील 50 कुटूंबांना जवळील इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

      आय प्रभागातही वसार गावातील चाळीत पाणी शिरल्यामुळे  पाण्याचा निचरा करण्यासाचे काम सुरूआहे. ग प्रभागतही टंडन रोड येथे जमा झालेले पावसाचे पाणी जेसीबीने कच्चे गटार काढून सदर पाण्याचा निचरा करण्यात आला. महापालिकेची अग्निशमण यंत्रणेकडे 6मशिनसह रबर बोट, 100 लाईफ बॉय, 250 लाईफ जॅकेट, 1000 -2000 मी. पर्यंत दोरखंड, पट्टीचे पोहणारे 50 जलतरण पटू सह आपत्कालिन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज  असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Kalyan Dombivli Rain: 387.8 mm rainfall recorded in Kalyan Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.