हौसिंच्या फेरफटक्याचा फटका : शिळ महामार्गावर वाहतूक कोंडीने कल्याण डोंबिवलीकर हैराण
By अनिकेत घमंडी | Published: September 17, 2022 03:32 PM2022-09-17T15:32:15+5:302022-09-17T15:57:16+5:30
कल्याण शीळ रस्त्यावर ती वाहने गेल्याने सुयोग हॉटेल ते सोनारपाडा आणि प्रमियर परिसरात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते.
डोंबिवली: पावसाने उघडीप घेतल्याने व शनिवारी सुटी असल्याने शेकडो वाहनचालकांनी वाहने घेऊन फेरफटका मारण्याच्या हेतूमुळे डोंबिवली शहरात मानपाडा रस्ता, टिळक चौक ते शेलार नाका आणि घरडा सर्कल ते आर आर बाज हॉस्पिटल पर्यन्त शेकडो वाहने एकाच वेळी आल्याने सकाळपासून दुपारपर्यन्त त्या सर्व भागांत वाहतूक कोंडी झाली होती. त्यात कल्याण शीळ रस्त्यावर ती वाहने गेल्याने सुयोग हॉटेल ते सोनारपाडा आणि प्रमियर परिसरात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले होते.
गुरुवार, शुक्रवारी पावसाने शहरांना झोडपून काढले होते, त्यात शनिवारी पावसाने उघडीप घेताच वाहन चालकांनी चार चाकी वाहने घेऊन फेरफटका मारला, मात्र त्याचा त्रास शहरातील रहदारीला बसला आणि वाहतूक कोंडीमुळे सगळ्यांचे नियोजन फसले. हमरस्त्यांसह छोट्या अंतर्गत रस्त्यांवर देखील वाहने अडकून पडल्याने कोंडी झाली होती. कल्याणमध्ये शहरात शिरताना शिवाजी चौकाआधी वाहनांची रांग लागलेली होती, अवजड वाहने देखील असल्याने छोट्या वाहनांची वाट अडवली होती, दुचाकी स्वार जागा।मिळेल तसे पुढे येत असल्याने त्यांचीही अडचण झाली होती, सकाळपासूनच वाहतूक कोंडीने वाहतूक नियंत्रण विभाग देखील हैराण झाला होता.
पावसाने उसंत घेताच, आणि शनिवारच्या सुटीचा फायदा घेत अनेकांनी शहरांतर्गत वाहने बाहेर काढली, अरुंद रस्ते आणि खड्डे यामुळे टिळक चौक ते घरडा सर्कल।परिसरात बराच वेळ वाहतूक।कोंडी झाली होती, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिकारी,।कर्मचारी वोर्डन सगळे कामाला लागले होते. उमेश गित्ते, प्रभारी पोलीस निरीक्षक, डोंबिवली, ट्रॅफिक विभाग.