कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना गोळ्या घालण्याची धमकी
By मुरलीधर भवार | Published: June 5, 2024 08:34 PM2024-06-05T20:34:51+5:302024-06-05T20:35:11+5:30
या प्रकरणी शहर प्रमुख गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कल्याण- शिंदे सेनेचे कल्याण पूर्वेतील शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबूक अकाऊंटवरुन दीपक कदम नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शहर प्रमुख गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोळसेवाडीपोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पाेलिस ठाण्यात शहर प्रमुख गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या घटनेपश्चात आत्ता ही धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
द्वारली येथील जमीनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शहर प्रमुख गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील त्यांचा मुलगा हा फरार आहे.शहर प्रमुख गायकवाड यांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर
त्यांनी त्यांचे राजकीय कामकाज सुरु केले. कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक
नुकतीच पार पडली. या निवडणूकीच्या प्रचारात शहर प्रमुख गायकवाड हे सक्रीय होते. दीपक कदम नावाच्या व्यक्तीने फेसबूक अकाऊंटवरुन शहर प्रमुख गायकवाड यांना धमकी दिली आहे. आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या होत्या. मी आठ गोळ्या घालीन. कदम याने शहर प्रमुक गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी येताच शहर प्रमुख गायकवाड यांनी कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन धमकी देणाऱ््या कदम याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.फेसबूक अकाऊंटवरुन जीवे मारण्याची धमकी आल्याने पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. धमकी देणारा कदम हा व्यक्ती कोण आहे? त्याने अशा प्रकारे धमकी का दिली? या प्रकरणाचा उलगडा तपासअंती होणार आहे.