आयुक्तांच्या आदेशानंतर कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक करण्यात आला स्वच्छ
By मुरलीधर भवार | Published: June 11, 2024 03:59 PM2024-06-11T15:59:45+5:302024-06-11T16:00:27+5:30
मागील कित्येक महिन्यापासून कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक केर कचऱ्याने भरला होता. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने स्थिती दयनीय होती.
कल्याण - कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक स्वच्छता न झाल्यामुळे अस्वच्छ होता. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारींवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या आदेशानंतर कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक स्वच्छ करण्यात आला.
मागील कित्येक महिन्यापासून कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक केर कचऱ्याने भरला होता. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने स्थिती दयनीय होती. याबाबत येथून प्रवास करणारे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट केले आणि त्यानंतर आयुक्त डॉ इंदू जाखड यांस त्याबाबत माहिती कळविली. आयुक्त यांनी तक्रारीची त्वरित दखल घेतली आणि संबंधित विभागास आदेश दिले. यानंतर चक्रे फिरली आणि कित्येक महिन्यापासून अस्वच्छ असलेला स्काय वॉक पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.