कल्याण मुख्याध्यापकाने साजरा केला तृतीयपंथीयांच्या सोबत वाढदिवस
By मुरलीधर भवार | Published: September 23, 2023 04:26 PM2023-09-23T16:26:24+5:302023-09-23T16:26:54+5:30
सामाजिक न्याय व एवंम अधिकारीता मंत्रालय द्वारा किन्नर आणि अस्मिता या संस्थेत तृतीयपंथियांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. या
कल्याण - शहराच्या पूर्व भागातील सम्राट अशोक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी यावर्षी तृतीयपंथीयांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला.
सामाजिक न्याय व एवंम अधिकारीता मंत्रालय द्वारा किन्नर आणि अस्मिता या संस्थेत तृतीयपंथियांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. गुलाबराव पाटील म्हणाले मुक्त विद्यापीठांद्वारे सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे. व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःचे व्यवसाय आपण निर्माण करू शकतो.स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो.आपण स्वतःला कमजोर समजू नये.
संस्थेच्या अध्यक्षा नीता गुरू म्हणाल्या लोकांमध्ये आमच्याबद्दल उगीच नावडती भावना तयार झाली आहे. लोक आम्हाला वाळीत टाकल्यासारखे अजूनही वागतात.आम्ही कोणाला त्रास देत नाही. माझ्या संस्थेच्या माध्यमातून छोटे कोर्स देऊन माझ्या सहकाऱ्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचा प्रयत्न आहे. गुलाबराव पाटील आणि रूपाली पाटील यांनी आमच्या संस्थेला भेट देऊन आमच्या बरोबर गप्पा गोष्टी करत चांगले मार्गदर्शन केले. वाढदिवस त्यांचे मी धन्यवाद मानते.आणि पुढील निरोगी आयुष्यास शुभेच्छा देते असे नीता गुरू म्हणाल्या.