जागेच्या वादातून शेतकरी आणि बिल्डर यांच्या प्रचंड वादंग; पोलिसांनी तीन महिलांना घेतले ताब्यात
By मुरलीधर भवार | Updated: February 13, 2025 17:03 IST2025-02-13T17:02:29+5:302025-02-13T17:03:24+5:30
शेतकरी कुटुंबातील महिलांचा बिल्डरला कडाडून विरोध

जागेच्या वादातून शेतकरी आणि बिल्डर यांच्या प्रचंड वादंग; पोलिसांनी तीन महिलांना घेतले ताब्यात
कल्याण: कल्याण शीळ रस्त्यालगत नेकणीपाडा येथे असलेल्या पाच एक जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. या जागेवर शेतकरी आणि बिल्डर यांनी दावा सांगितला आहे. आज बिल्डर त्या जागेवर आला असता त्याला शेतकरी कुटुंबियांनी कडाडून विरोध केला. यावेळी बिल्डरने कंटेनर केबीन आत आणत असताना प्रवेशद्वाराजवळ शेतकरी कुटुंबातील महिलांनी ठिय्या दिला. पोलिसांनी या महिलांना दूर करीत ताब्यात घेतले आहे. हा वाद चिघळू नये यासाठी पोलिसांचा पोलिस बंदोबस्त त्याठिकाणी तैनात आहे.
शेतकरी वासूदेव पाटील यांच्या जागेत त्यांनी शेड उभारली आहे. जागेला पत्र्यांचे कुंपण घातले आहे. या जागकेत आज बिल्डर पाेहचला. त्यांनी न्यायालयाचे आदेश दाखवित जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मानपाडा पोलिस ठाण्याचे पाेलिस पोहचले. त्याठिकाणी पोलिसांच्या समोरच बिल्डर आणि शेतकरी कुटुंबियांत बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर वादात झाले. यावेळी जागेच्या संरक्षक कुंपणाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. प्रवेशद्वार बंद करण्यास बिल्डरकडून हरकत घेण्यात आली. तेव्हा पोलिसांनी प्रवेशद्वारे उघडे केले. प्रवेशद्वाराबाहेर बि्लडरने मागविलेले असंख्य खाजगी बाऊन्सर उभे होते. त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. त्यानंतर शेतकरी कुटुंबातील महिलांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला. बिल्डरने कंटेनर केबिन एका टेम्पोबर आण्यास सुरुवात केली. प्रवेशद्वाराजवळ महिलांनी कंटेनर केबिन आत आण्यास तीव्र विरोध केला. त्यावेळी महिला पोलिसांनी विरोध करणाऱ््या शेतकरी महिलांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस व्ह’नमध्ये बसवून मानपाडा पाेलिस ठाण्यात नेण्यात आले.
याबाबत शेतकरी वासूदेव पाटील यांचे म्हणणे आहे की, ही जागा वडिलोपार्जीत त्यांची आहे. या जागेवर त्यांचा कब्जा आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असता त्याठिकाणी बिल्डर पोलिस बळाचा वापर करुन जागेत शिरकाव करीत असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी आशिष पेडणेकर यांनी सांगितले की, ही जागा त्यांचे आजोबा दत्ताराम बारसकर यांची आहे. मी त्यांचा नातू आहे. ५० वर्षापूर्वी ही जागा घेतली होती. आमच्याकडे जागेची कागदपत्रे आहे. हे प्रकरण न्यायालयात गेेल्यावर न्यायालयाने आदेश दिले आहे. ही जागा मोकळी होती. त्याठिकाणी संबंधितांनी शेड बांधले आहे. त्यामुळे आमचीच जागा आम्ही हडप करतो हा आरोपच चुकीचा आहे.