Kalyan: शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणच्या महादुर्ग ऍडव्हेंचरने किल्ले शिवनेरीवर केली जनजागृती
By मुरलीधर भवार | Published: February 18, 2023 01:57 PM2023-02-18T13:57:28+5:302023-02-18T13:58:39+5:30
Kalyan: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील साहसी संघ आणि नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रयत्नांने किल्ले शिवनेरीवर जनजागृती मोहीम महादुर्ग अॅडव्हेंचर वतीने करण्यात आली.
- मुरलीधर भवार
कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणमधील साहसी संघ आणि नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या प्रयत्नांने किल्ले शिवनेरीवर जनजागृती मोहीम महादुर्ग एॅडव्हेंचर वतीने करण्यात आली.
जनजागृती मोहीम असल्याने विद्यार्थ्यांनी हातात "गडकिल्ले वाचवा" अश्या आशयाचे आवाहन करणारे फलक हातात घेऊन जानजागृती केली गेली. किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मस्थळी मुलांच्यावतीने सांस्कृतिक गाणी ही म्हटली. या कार्यक्रमात दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शाळेच्या वतीने शिक्षक ज्योत्स्ना गजरे, ममता वसावे, तृप्ती परदेशी, सुषमा मोटघरे, विजया सणस, विकास चव्हाण, दिनेश प्रधान आणि संजय जाधव उपस्थित होते. महादुर्ग ऍडव्हेंचर ह्यांच्या वतीने भूषण पवार, नितेश पाटील, सागर डोहळे, अक्षय जमदरे, कल्पेश बनोटे, विकी बुरकुले, अक्षय घरत, योगेश शेळके आणि उज्वला शेळके उपस्थित होते. जनजागृती मोहिमेला नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे यांनी सहकार्य केले.
महादुर्ग संघाला सह्याद्रीच्या खोऱ्यात साहसी खेळ तसेच गडकिल्ले अभ्यासाचा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे गडकोटांची होत चाललेली दुरवस्था पाहता येणाऱ्या युवा पिढीत गडकोटांना एक पर्यटन स्थळ म्हणून न पाहता एक ऐतिहासिक वास्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन रूजू व्हावा ह्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे महादुर्गच्या वतीने भूषण पवार ह्यांनी सांगितले.