राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंची बाजी

By मुरलीधर भवार | Published: October 14, 2022 02:56 PM2022-10-14T14:56:30+5:302022-10-14T14:56:56+5:30

कल्याणच्या खेळाडूंनी कुमिते आणि काता या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करीत २१ पदकांची लयलूट केली.

Kalyan players compete in national karate competition | राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंची बाजी

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कल्याणच्या खेळाडूंची बाजी

googlenewsNext

कल्याण : गुजरात येथे वर्ल्ड गोजू-रू कराटे डोतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मार्शल आर्ट ॲण्ड स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया या संस्थेमार्फत कल्याणच्या खेळाडूंनी कुमिते आणि काता या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करीत २१ पदकांची लयलूट केली.

वलसाड येथे झालेल्या सातव्या राष्ट्रीय स्पर्धेत देशातील ६०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने महाराष्ट्र, राज्यस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व अन्य राज्यांतून खेळाडू सहभागी झाले होते. सर्व वेजेते खेळाडूंना सेंसाई महेश चिखलकर यांचे प्रशिक्षण, तर शिहान भाईदास देसले यांचे मार्गदर्शन लाभले. विजेते विद्यार्थांचे कल्याण क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

स्पर्धेतील विजेते खेळाडू :
कुमिते प्रकारात सुवर्ण पदक विजेते : अर्चित पाटील. रजत पदक विजेते : नैतिक राऊत, गौरवी तारी, उजाला यादव. कांस्यपदक विजेते : ओम कांबळे, प्रांजल कुतरवाडे, मंजिरी कुतरवाडे, आशिष सहेजराव, सुमेध गायकवाड. काता प्रकारात सुवर्ण पदक विजेते : ओम कांबळे, अर्चित पाटील, प्रांजल कुतरवाडे, गौरवी तारी. रजत पदक विजेते : सिद्धी काकड, सुमेध गायकवाड. कांस्यपदक विजेते : नैतिक राऊत, मंजिरी कुतरवाडे, उजाला यादव, चेतना साळुंके, आशिष सहेजराव.

Web Title: Kalyan players compete in national karate competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.