पार्किंगमधील दुचाक्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केली अटक

By मुरलीधर भवार | Published: October 6, 2022 06:35 PM2022-10-06T18:35:43+5:302022-10-06T18:36:35+5:30

पार्किंगमधील दुचाक्या चोरणाऱ्या चोरट्याला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. 

Kalyan Police has arrested the thief who stole the bike from the parking lot | पार्किंगमधील दुचाक्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केली अटक

पार्किंगमधील दुचाक्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी केली अटक

Next

कल्याण : पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाड्या हेरून गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नंदुलाल भोईर असे आरोपीचे नाव असून नंदूलाल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात या आधी देखील कल्याण महात्मा फुले पोलीस ठाणे आणि कसारा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नंदुलाल हा महिनाभरापूर्वी बाईक चोरीच्या गुन्ह्यातून जेलमधून सुटून आला होता. 

दररोज हजारो चाकरमानी आपल्या दुचाकी रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला असलेल्या पार्किंगमध्ये पार्क करून कामाला जात असतात ते संध्याकाळीच परततात. रेल्वे स्टेशन लगत असलेल्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरतील पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचा शोध सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच खबऱ्यांमार्फत या चोरट्याची माहिती मिळवली.

पोलिसांनी तात्काळ नंदूलालचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नंदुलाल हा मूळचा राहणारे शहापूर येथे राहणारा आहे. रेल्वे स्थानकालगत असलेल्या पार्किंगमधील दुचाकी हेरायचा आणि या दुचाकी चोरी करीत होता. पार्किंगमधून दुचाकी केल्याप्रकरणी त्याला आधी देखील कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अटक केली होती. महिनाभरापुर्वी तो जेलमधून जामिनावर सुटला होता त्यानंतर त्याने महिनाभरात पुन्हा आपला हा चोरीचा धंदा सुरू केला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
 

Web Title: Kalyan Police has arrested the thief who stole the bike from the parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.