कल्याण स्टेशनवर मोठा अपघात; धावती एक्स्प्रेस ट्रेन पकडताना तिघांचा गेला तोल, एकाचा मृत्यू

By अनिकेत घमंडी | Published: October 6, 2023 10:43 AM2023-10-06T10:43:35+5:302023-10-06T10:43:59+5:30

एक्स्प्रेसचा वेग कमी असताना ट्रेन पकडण्याचा केला प्रयत्न

kalyan railway accident deccan queen express while catching train at kalyan station one dead some injured | कल्याण स्टेशनवर मोठा अपघात; धावती एक्स्प्रेस ट्रेन पकडताना तिघांचा गेला तोल, एकाचा मृत्यू

कल्याण स्टेशनवर मोठा अपघात; धावती एक्स्प्रेस ट्रेन पकडताना तिघांचा गेला तोल, एकाचा मृत्यू

googlenewsNext

Kalyan Deccan Express Train Accident: मुंबईतील गोरेगाव परिसरात काल रात्री पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा एक वाईट घटना घडली. धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढताना काही प्रवाशांचा पाय घसरला त्यामुळे एक मोठा अपघात घडला. या घटनेत एक प्रवासी गंभीर जखमी झाला तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. डेक्कन एक्सप्रेस पकडण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात कल्याण स्थानकात झाला. जखमींना स्टेशनवरील हमालांनी रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

पुणे मुंबई डेक्कन एक्स्प्रेसला अप मार्गे येताना कल्याणरेल्वे स्थानकात थांबा नसताही धावत्या गाडीतून उतरणाऱ्या दोन प्रवाशांपैकी एकाचा मृत्यू तर एक प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९.३०च्या सुमारास घडली. कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. मृत व्यक्तीचे नाव अद्याप समजले नाही. दुसऱ्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी कल्याण महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. थांबा नसताना गाडीत चढण्याचा मोह त्यांना भोवला. परंतु रेल्वेचा वेग मर्यादित असल्याने दुसऱ्याचा जीव वाचल्याचे इतर प्रवाशांनी सांगितले.

डेक्कन क्वीन एक्सप्रेस कल्याण स्थानकात थांबत नाही. या स्टेशनवर एक्सप्रेसचा वेग काहीसा कमी होतो. त्यामुळे धावणारी एक्सप्रेस ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात दोन ते तीन प्रवासी ट्रेनजवळ गेले. त्यानंतर त्यांचा तोल जाऊन ते रूळावरच पडल्याची माहिती इतर प्रवाशांनी दिली. त्यानंतर आर पी एफ, जी आर पी घटनास्थळी दाखल झाले. तोवर मात्र त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्यांना रूग्णालयात नेले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. 

कल्याण लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार ते दोघे भाऊ असण्याची शक्यता असून पुणे येथून प्रवासाला निघाले होते. जखमीची तब्येत स्थिर असून तो काही वेळात माहिती देईल आणि मृताच्या नावासह अन्य तपशील मिळेल अशी शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: kalyan railway accident deccan queen express while catching train at kalyan station one dead some injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.