बुद्धिबळ - कॅरम स्पर्धेने कल्याण क्रीडा महोत्सवाचा सांगता

By मुरलीधर भवार | Published: January 29, 2024 03:08 PM2024-01-29T15:08:44+5:302024-01-29T15:08:55+5:30

शेवटच्या दिवशी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सेंट थॉमस शाळेने बाजी मारली.

Kalyan Sports Festival concludes with Chess-Carrom Tournament | बुद्धिबळ - कॅरम स्पर्धेने कल्याण क्रीडा महोत्सवाचा सांगता

बुद्धिबळ - कॅरम स्पर्धेने कल्याण क्रीडा महोत्सवाचा सांगता

कल्याण - स्पोर्ट्स केअर फाउंडेशन आयोजित स्व. यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ चौथ्या कल्याण क्रीडा महोत्सवा शेवटच्या दिवशी बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेने समारोप करण्यात आला. गेले दोन महिने प्रत्येक रविवारी कल्याण डोंबिवली मध्ये संपन्न झालेल्या.. या महोत्सवामध्ये मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर पालघर, आणि रायगड येतील ९४ शाळा-क्लब मधील ३ हजार ८४० खेळाडू १ क्रीडा शिक्षक-प्रशिक्षक आणि ३९ क्रीडा आणि कला प्रकारामध्ये सहभाग घेऊन क्रीडा महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला. 

शेवटच्या दिवशी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सेंट थॉमस शाळेने बाजी मारली. सेंट लॉरेन्स शाळेने उपविजेतेपद पटकावले. ठाण्याच्या अंबर इंटरनॅशनल शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली. ही स्पर्धा ८,१०१२, १४ आणि १६ या वयोगटात खेळवण्यात आली. क्रीडा महोत्सवाचे प्रमुख आयोजक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप ओंबासे यांनी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. 

क्रीडा महोत्सवा बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, क्रीडा महोत्सवाचे पाचवे वर्ष असून क्रीडा वातावरण तयार करण्याबरोबरच छोट्या खेळाडूने जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा आणि छोट्या खेळाडूंना ही स्पर्धेमध्ये वाव मिळावा हा प्रमुख उद्देश ठेवून कल्याण क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळाला तसेच पुढील वर्षीही यामध्ये नवनवीन बदल करून अनेक खेळाचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे, असे ओंबासे यांनी सांगितले. स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी क्रीडा शिक्षक राम निंबाळकर, नरेंद्र वामनोरे, मितेश जैन , बुद्धिबळ प्रशिक्षक अमित भोजने, रुपेश राजगुरू, रमेश कदम, गिरीश वाधवा हे उपस्थित होते.
 

Web Title: Kalyan Sports Festival concludes with Chess-Carrom Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण