किल्ले दुर्गाडीच्या जागेवरचा दावा कल्याण न्यायालयाने फेटाळला
By मुरलीधर भवार | Published: December 10, 2024 05:23 PM2024-12-10T17:23:44+5:302024-12-10T17:24:08+5:30
Kalyan News: कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने दावा सांगितला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याणमधील ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर मजलिसे मुसावरीन औकाफ या मशीद संघटनेने दावा सांगितला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला होता. हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला आहे.तब्बल ४८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लागलेल्या या निकलाचे शिवसेना भाजप हिंदुत्ववादी संघटनांनी स्वागत केलं आहे.
मुजलिसे मुशावरीन औकाफ ही मशीद संघटना आहे. या संघटनेच्या वतीने किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा करत हा दावा कल्याण न्यायालयात दाखल केला होता. हा दावा १९७४ पासून प्रलंबित होता. या दाव्याच्या आधारे ठाणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किल्ले दुर्गाडी येथील सुरु असलेल्या सुशोभिकरणाच्या कामास हरकत घेण्यात आली होती. या दाव्या प्रकरणी यापूर्वी न्यायालयाने जैसे थे आदेश दिले होते. आज या दाव्याची सुनावणी होती. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबत सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी ही जागा मजलिसे मुशावरीन औकाफ यांच्या कायदेशीर मालकीची नाही. त्याचा त्यावर अधिकार नाही.ही जागा शासनाची आहे .. त्यांनी दाखल केलेला प्रलंबित दावा मुदतबाह्य असल्याने हा दावा फेटाळण्यात आला आहे. कल्याणचे प्रथमवर्ग दिवाणी न्यायधीश ए. एस. लांजेवार यांनी हा दावा फेटाळून लावला असल्याचे सांगितले .तर हा दावा फेटाळला असला दावेदारअपीलात जाऊ शकतो.
या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर किल्ले दुर्गाडीवर प्रचंड पोलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त ठेवला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी काळजी घेतली असल्याचे सांगितले.