मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा

By मुरलीधर भवार | Published: June 15, 2024 06:30 PM2024-06-15T18:30:40+5:302024-06-15T18:32:12+5:30

केडीएमसी आयुक्तांनी घेतली एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक विभागासोबत बैठक

Kalyan Traffic Congestion Caused by Metro Work Solution to Divert Traffic | मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा

मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा

कल्याण-कल्याण तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कल्याण शीळ रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक बदलापूर पाईप लाईन रस्ता-मलंग रोड, चक्कीनाका मार्गाने वळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मानपाडा रोडने लहान वाहनांची वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मेट्रोच्या कामात समन्वय साधण्यासाठी आणि किमान जागेत प्रकल्पाचे काम सुरू ठेवून वाहतूक समस्या सोडविणे. मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याकरीता एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक पोलिस आणि केडीएमसी यांची बैठक आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात काल आयोजित करण्यात आली होती.

मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी यांना मानपाडा स्टेशन व हेदुटने दरम्यान मेट्रोसाठी डीपी रोडचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएच्या विभागाशी समन्वय साधणे या विषयावर चर्चा करण्यात आली. एमएसआरडीसीच्य ाअधिकारी यांनी संपूर्ण कल्याण शीळ रस्ता एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

कल्याण तळोजा या मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. कल्याण शीळ रस्ता हा महापालिका क्षेत्रातील मुख्य हमरस्ता आहे. याच मार्गाने सर्वात जास्त अवजड वाहनांची वाहतूक होते. मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे शीळ रस्त्यावर लोखंडी बॅरिकेट्स टाकून कामात सुरुवात करण्यात आली आहे, यामुळे अनेक ठिकाणी रस्ता अरुंद झाला असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. कल्याण शीळ रस्त्याच्या ज्या भागात मेट्रो कामाव्यतिरिक्त दोन्ही बाजूस वाहतुकीच्या दोन लेन्स सुरू आहेत, तेथे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले . एमएमआरडीसीकडून कल्याण शीळ रस्त्याच्या ज्या भागात रुंदीकरण अपूर्ण आहे. त्याठिकाणचे भूसंपादन त्वरीत करुन रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे. त्याचप्रमाणे बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या तिसऱ्या लेनचे काम अपूर्ण आहे. त्याठिकाणी खडीकरण पूर्ण करण्यात यावे. मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी यांनी वाहतूक व्यवस्था राखणे कामी ट्रॅफिक वॉर्डन, सूचना फलक आणि सुरक्षा विषयी साधने वाहतूक पोलीस शाखा यांच्या सूचनेनुसार पुरविण्याचे या बैठकीत मान्य केले आहे.
 

Web Title: Kalyan Traffic Congestion Caused by Metro Work Solution to Divert Traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.