Kalyan: कल्याणमध्ये महिला घर कामगार, समस्या निवारण परिषदेचे आयाेजन
By मुरलीधर भवार | Updated: July 6, 2024 20:45 IST2024-07-06T20:45:16+5:302024-07-06T20:45:33+5:30
Kalyan News: कल्याणमधील साईबाबा ग्राम प्रतिष्ठान प्रियजन गुण गौरव समितीच्या वतीने उद्या ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉलमध्ये महिला घर कामगार समस्या निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Kalyan: कल्याणमध्ये महिला घर कामगार, समस्या निवारण परिषदेचे आयाेजन
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याणमधील साईबाबा ग्राम प्रतिष्ठान प्रियजन गुण गौरव समितीच्या वतीने उद्या ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता अत्रे रंगमंदिर कॉन्फरन्स हॉलमध्ये महिला घर कामगार समस्या निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला केडीएमसी आयुक्त डॉ’. इंदूराणी जाखड, माजी सिडको अध्यक्ष प्रमाेद हिंदूराव यांच्यासह डॉ. गिरीश लटके, माया कटारीया आणि ज्येष्ठ पत्रकार रमेश दुधाळकर उपस्थित राहणार आहे. महिला घर कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यावर चर्चा करुन त्यांच्याकरीता राज्य सरकारने काय योजना लागू केल्या आहेत. तसेच नव्या योजना काय आहेत ? या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.