कल्याणकरांना मिळणार काव्यमय मेजवानी; वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 10:18 PM2021-08-12T22:18:47+5:302021-08-12T22:19:02+5:30

       गेल्या दोन दशकांपासून कल्याण शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वात कार्यरत पू.ल. कट्टा ही संस्था कार्यरत आहे.

Kalyankar will get a poetic feast; Vamandada Kardak birth centenary celebrations | कल्याणकरांना मिळणार काव्यमय मेजवानी; वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन

कल्याणकरांना मिळणार काव्यमय मेजवानी; वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन

Next

कल्याण- शहर, खेड, वाडीवस्ती , झोपडपट्टी आणि शहरात  आपल्या लेखणीने सर्वदूर पोहचलेले कवी म्हणजे वामनदादा कर्डक !  त्यांनी आपल्या कविता , गझल, आणि गीतांमधून  समता बंधुता न्याय ही आपल्या संविधानाची त्रिसूत्री आणि फुले- शाहू- आंबेडकर विचार खेडोपाडी पोहचवले.  गरीब कष्टकरी, कामगार, वर्गाच्या केवळ व्यस्था आणि कथाच  मांडल्या नाही तर समता, बंधुता सामाजिक न्याय टिकून राहावा म्हणून तळमळीनं लेखन केल. त्यांची  अनेक गीत समाज परिवर्तनाच्या लढ्याचे गीत बनले.  अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी लोककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याचे यजमानपद कल्याण शहराला मिळाले आहे.
      
गेल्या दोन दशकांपासून कल्याण शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वात कार्यरत पू.ल. कट्टा ही संस्था कार्यरत आहे. पु ल देशपांडे यांच्या स्मृती कल्याण नगरीत जपण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ह्या मंचाने आजवर अनेक साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वीपणे राबविले असून त्यांच्यामार्फत हा वामनदादा कर्डक जन्मशताब्दी सोहळा संपन्न होत आहे. 

अनेकदा कार्यक्रमानिमित्त वामनदादा अनेक वेळा कल्याण नगरीत येत असत, वास्तव्य करीत आणि आपल्या लेखणीने अनेकांना प्रेरणा देत असत. अशा या लोककवीला मानवंदना म्हणून पु.ल.कट्ट्यातर्फे हा जन्मशताब्दी हा सोहळा साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी कल्याण नगरीतील समविचारी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर- कार्यकर्ते यांनी एकत्रित येत जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. यामध्ये कवी-कथाकार किरण येले यांची जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी तर प्रा. प्रशांत मोरे यांची कार्याध्यक्षपदी तर स्वागताध्यक्षपदी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आली आहे. 

शनिवारी १४ ऑगस्ट रोजी, या जन्मशताब्दी सोहळ्याचे उद्घाटन जेष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या प्रमूख उपस्थितीत होणार आहे. या जन्मशताब्दी सोहळ्यात वामनदादा कर्डक यांचे साहित्य आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे आमदार  भोईर यांनी सांगितले. करोना काळात सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे कार्यक्रम केले जाणार आहेत.

Web Title: Kalyankar will get a poetic feast; Vamandada Kardak birth centenary celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.