सृजनांकूर एक साहित्यानंद कार्यक्रमाला कल्याणकरांचा प्रतिसाद

By अनिकेत घमंडी | Published: July 1, 2024 01:13 PM2024-07-01T13:13:30+5:302024-07-01T13:14:24+5:30

छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या विद्यामंदिर मांडा येथे बंध भावनांचे समूह आयोजित सृजनांकूर एक साहित्यानंद हा साहित्यावर आधारित कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Kalyankar's response to Srijanankur Ek Sahityanand program | सृजनांकूर एक साहित्यानंद कार्यक्रमाला कल्याणकरांचा प्रतिसाद

सृजनांकूर एक साहित्यानंद कार्यक्रमाला कल्याणकरांचा प्रतिसाद

डोंबिवली: छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या विद्यामंदिर मांडा येथे बंध भावनांचे समूह आयोजित सृजनांकूर एक साहित्यानंद हा साहित्यावर आधारित कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी उपस्थित होते.  त्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सृजनांकूर या ई- मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

काव्य संग्रह प्रकाशित झालेल्या श्रीहरी पवळे, ऋतुजा गवस व शुभांगी भोसले यांचा सत्कार करण्यात आला. काही निवडक कवितांचे काव्यवाचन समारंभात झाले. आपल्या भाषणात बोलतांना प्रवीण देशमुख यांनी पावसावर कविता सादर केली. शिक्षकी पेशाचे सामाजिक महत्त्व प्रतिपादीत करून शिक्षकांचा गौरव केला. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विविध साहित्यिक उपक्रमांची माहिती देवून त्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन साहित्यिकांना केले. कवी दुर्गेश सोनार यांनी काव्याच्या विविध प्रकारांची माहिती श्रोत्यांना करून देवून काही कवितांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले. कार्यक्रमाला तलासरी, पालघर, माढा, रायगड जिल्हा,ठाणे, नवी मुंबई येथील साहित्यिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. नारायण फडके, सरचिटणी निलेश रेवगडे, चिटणीस वेदपाठक, उपकार्याध्यक्ष विश्वास सोनावणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Web Title: Kalyankar's response to Srijanankur Ek Sahityanand program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.