कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गणेश उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष
By मुरलीधर भवार | Published: September 7, 2024 03:16 PM2024-09-07T15:16:12+5:302024-09-07T15:17:22+5:30
कर्तव्य बजावून पोलीस मोठ्या भक्ती भावाने करतात गणेशाची आराधना.
मुरलीधर भवार / कल्याण
कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात आज श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात गेल्या २५ वर्षांपासून गणेशाची स्थापना केली जात आहे. पोलीस ठाण्याचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
पोलीस म्हटले की त्यांना १२ तास ड्युटी असते. काही वेळेस १२ तासापेक्षा जास्त ड्युटी करावी लागते. विशेष करून सण उत्सवाच्या काळात पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त द्यावा लागतो. आपल्या व्यस्त कामकाजातून बाजारपेठ पोलिसांनी गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशाची आराधना सुरू ठेवली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या आशयाची प्रार्थना त्यांनी गणेश स्थापनेच्या वेळी केली आहे. दहा दिवसाच्या पुजार्चेनंतर अनंत चतुर्थी च्या दुसऱ्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश सिंग गौड यांच्या हस्ते दररोज गणेशाची आरती होणार आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी सुरेश पाटील यांनी दिली आहे.