कल्याणचा रिंग रोड होणार हिरवागार, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्त साधत व़ृक्षाराेपण

By मुरलीधर भवार | Published: April 22, 2023 05:33 PM2023-04-22T17:33:07+5:302023-04-22T17:33:40+5:30

या रस्त्याच्या दुतर्फा १२०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

Kalyan's ring road will be green, tree-planted to mark World Beauty Day | कल्याणचा रिंग रोड होणार हिरवागार, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्त साधत व़ृक्षाराेपण

कल्याणचा रिंग रोड होणार हिरवागार, जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्त साधत व़ृक्षाराेपण

googlenewsNext

कल्याण-कल्याण डाेंबि्वलीतील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी राबविला जात असलेल्या रिंग राेड प्रकल्पाचा दुर्गाडी ते टिटवाळा हा टप्पा ८० टक्के पूर्ण झाला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा १२०० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. आज जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत साडे चारशे वृक्षांचे वृक्षाराेपण करण्यात आले. येत्या वर्षभरात हा रस्ता हिरवागार हाेणार आहे. 

दुर्गाडी ते टिटवाळा या रिंगराेडच्या कामात अनेक झाडे आणि शेतजमिनी बाधित झाल्या. या रस्त्याचे काम हाती घेण्यापूर्वी बाधित हाेणाऱ्या झाड्यांच्या बदल्यात महापालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून आंबिवली टेकडीवर १५ हजार पेक्षा जास्त झाडे लावली. ही टेकडी आत्ता ऑक्सिजन झाेन झाली आहे. रिंग  राेडच्या दुतर्फा १२०० झाडे लावली जाणार आहे. त्यापैकी साडे चारशे झाडे आज वसुंधरा दिनाचे औचित्य साधत लावली असल्याची माहिती कल्याण डाेंबिवली महापालिकेचे सचिव संजय जाधव यांनी दिली आहे.

याठिकाणी केवळ शाेभेची झाडे लावली जाणार नसून ती पर्यावरण पूरक असतील याची काळजी घेतली जाणार आहे. महाराष्ट्राचा राजवृक्ष असलेलया ताम्हाणसह कदंब, जांभूळ, माेहगणी, बकूळ आदी विविध प्रजातीची झाडे लावली जाणार आहेत. झाडे लावण्यासाठी अनेक समाजिक संस्था पुढे आल्या आहेत. त्यापैकी देव इंजिनिअरिंग या नेव्हल गॅलरी आणि युद्ध नाैकेच्या स्मारकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून पहिल्या टप्प्यात १२०० झाडे लावली जाणार आहेत. या संस्थेकडून झाडांची देखभाल करीत निगा राखली जाणार आहे. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब असल्याचे देव इंजिनिअरिंगचे राज पुराेहित यांनी सांगितले. या प्रसंगी उद्यान अधीक्षक अनिल तामाेरे हे देखील उपस्थित हाेते. 

Web Title: Kalyan's ring road will be green, tree-planted to mark World Beauty Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण