कल्याणच्या सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर गिर्यारोहक संघाने सर केला वजीर सुळका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 02:57 PM2021-11-09T14:57:17+5:302021-11-09T14:57:55+5:30
Kalyan : ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ वजीर सुळका सर करण्यासाठी याआधीही सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर समूहाने विशेष प्रयत्न केले होते. त्यावेळी एक तासाच्या आत हा सुळका सर केला होता.
कल्याण : महाराष्ट्रातील गिर्यारोहक साहसाला आव्हान देणारा सर्वात अवघड असलेला 260 फूट उंचीचा 90 अंश कोनातील वजीर सुळका कल्याणमधील सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर या गिर्यारोहक संघाने नुकताच सर केला आहे. सुळक्याच्या पायथ्याशी शिवमूर्तीचे पूजन करुन सुळका सर करण्याची मोहिम सुरु केली गेली. ठाणे जिल्ह्यातील माहुली किल्ल्याजवळ वजीर सुळका सर करण्यासाठी याआधीही सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर समूहाने विशेष प्रयत्न केले होते. त्यावेळी एक तासाच्या आत हा सुळका सर केला होता.
वजीर सुळका सर करताना पाच स्थानकात भागला जातो. त्यात तब्बल शंभर फूटांचा ओव्हरहँग झूमरींग करुन पार करावा लागतो. समूहाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजीत भोसले, भूषण पवार, अक्षय जामधरे, देवीदास गायकवाड, महेश पाडवी आदी या मोहिमेत सहभागी झाले होते. वजीर सुळका सर करण्यासाठी सर्व प्रथम शहापूर येथील वांदे या गवातून प्रस्तान कराव लागते. सुळका सर करण्यासाठी दोन तासाचा ट्रेक करावा लागतो. 200 फूट उंचीवर गेल्यावर सूळक्याचा पाया लागतो. सुळक्याच्या पायथ्यापासून मोजले तर सुळक्याची उंची 260 फूट उंच इतकी आहे.
वजीर सुळका सर करण्याची सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरची ही दुसरीच मोहीम असल्याने केवळ एक तासात हा सुळका सर केला. वजीर सुळका हा अतिधोकादायक आणि कठीण चढाईच्या श्रेणीत गणला जातो. केवळ गिर्यारोहकणाच्या साहित्याने हा सुळका सह करता येतो. त्यात रोप, झूमर, डीसी, कॅरी. क्यू डी णि सुळक्याला असलेल्या बोल्टने सर करता येतो. सर्व अत्याधुनिक साहित्य असल्याने सुरक्षेची शंभर टक्केर खात्री होती. मानसिक तयारी आणि साहसाच्या जोरावर हा सुळका समूहाने सर केला. या सुळक्यावरुन शहापूर तालुक्यातील गावे, नदी नाले, शेती दृष्टीपथास पडतात.