बदलापुरात भाजपाच्या बैठकीत कपिल पाटील आणि किसन कथोरे समर्थक भिडले
By पंकज पाटील | Published: October 3, 2024 03:42 PM2024-10-03T15:42:55+5:302024-10-03T15:43:39+5:30
खाजगी सुरक्षा रक्षकाने रिवाल्वर काढल्यामुळे वातावरण तणावपूर्ण
पंकज पाटील, बदलापूर : बदलापूर शहरात आज मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या निरीक्षकांसमोरच माझी खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांचे समर्थक आपआपसात भिडले. हा वाद वाढल्यामुळे निरीक्षकांना ही बैठक रद्द करावी लागली. त्यानंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.
भाजपच्या प्रदेश कार्यालयाने प्रत्येक मतदारसंघात आज आढावा बैठक घेतली होती या आढावा बैठकीसाठी बदलापुरात भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्रित आले होते या बैठकीत कथोरे समर्थक आणि कपिल पाटील समर्थक असे दोन गट आल्यामुळे काही प्रमाणात वाद झाले कार्यकारणीच्या सदस्यांवरून दोन गटात वाद वाढल्यानंतर हे प्रकरण हाणामारी पर्यंत गेले.पक्षाचे निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकीत हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी ही बैठकच रद्द केली.
आमदार किसन कथोरे यांचे समर्थक अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश पाटील आणि कपिल पाटील यांचे समर्थक ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांच्यात हा वाद घडला असून हा वाद सोडवण्यासाठी आलेला कार्यकर्त्यांमध्ये तुरळक हाणामारी झाली. या वादावादी दरम्यान मोहपे यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने रिवाल्वर काढल्यामुळे या बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.