कशेडी बोगदा लवकरच होणार पूर्ण; मंत्री रवींद्र चव्हाणांनी केली पाहणी

By अनिकेत घमंडी | Published: August 26, 2022 04:07 PM2022-08-26T16:07:04+5:302022-08-26T16:08:26+5:30

या बोगद्यामुळे सुमारे पाऊण तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटात कापता येणार असल्याचे अभियंता अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kashedi tunnel will be completed soon; Minister Ravindra Chavan inspected | कशेडी बोगदा लवकरच होणार पूर्ण; मंत्री रवींद्र चव्हाणांनी केली पाहणी

कशेडी बोगदा लवकरच होणार पूर्ण; मंत्री रवींद्र चव्हाणांनी केली पाहणी

Next

अनिकेत घमंडी

डोंबिवली: मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यांची पाहणी करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कशेडी घाटात सुरू असलेल्या बोगद्याचे काम पाहिले, काम जलद होत असून आजूबाजूच्या वाडीतील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्याची व्यवस्था करण्याबाबतच्या सूचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी केल्या.

केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांसह राज्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या पुलाचे काम लवकर होणार असून त्याकडे स्वतः चव्हाण लक्ष देणार असून डिसेंबर २०२३ पर्यन्त याचेही काम पूर्ण व्हावे असा त्यांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. या बोगद्यामुळे सुमारे पाऊण तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटात कापता येणार असल्याचे अभियंता अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Kashedi tunnel will be completed soon; Minister Ravindra Chavan inspected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.