प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात केडीएमसीची कारवाई सुरूच!; दोन दिवसात 1 लाख 60 हजार दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:05 PM2022-01-05T19:05:41+5:302022-01-05T19:06:00+5:30
प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेने आपली कारवाई सुरू ठेवली असून महानगरपालिकेच्या विविध प्रभागात प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या पथकांनी गेल्या दोन दिवसात सुमारे 167 किलो प्रतिबंधित प्लास्टिक विविध दुकानातून जप्त केले
लोकमत न्यूज नेटवर्क :कल्याण
प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेने आपली कारवाई सुरू ठेवली असून महानगरपालिकेच्या विविध प्रभागात प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या पथकांनी गेल्या दोन दिवसात सुमारे 167 किलो प्रतिबंधित प्लास्टिक विविध दुकानातून जप्त केले आणि 1,60,000/- इतका दंड संबंधितांकडून आकारला आहे.
डोंबिवली येथील फ आणि ग प्रभागात रेल्वेस्थानक लगतच्या परिसरात ग प्रभाग क्षेत्र अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी तेथील नागरिक व व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करणे बाबत अवाहन करून जनजागृती केली त्याच प्रमाणे फ प्रभागातील भाजी विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
9/आय प्रभागात ही प्लास्टिक बंदी बाबत सहा. आयुक्त संजय साबळे यांनी व्यापारी संघटना व महिला बचत गट यांची एकत्रित सभा घेऊन त्यांना प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल न वापरण्याबाबत सूचना केल्या.