विना मास्क वावरणाऱ्या नागरीकांवर KDMC ची कारवाई, साडेपाच लाखाहून अधिक दंड वसूल  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 11:41 PM2021-03-11T23:41:31+5:302021-03-11T23:43:07+5:30

सार्वजनिक ठिकाणी वावरतांना अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

KDMC action on unmasked citizens, imposes fines of over Rs 5.5 lakh | विना मास्क वावरणाऱ्या नागरीकांवर KDMC ची कारवाई, साडेपाच लाखाहून अधिक दंड वसूल  

विना मास्क वावरणाऱ्या नागरीकांवर KDMC ची कारवाई, साडेपाच लाखाहून अधिक दंड वसूल  

Next

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका  प्रशासनाकडून विना मास्क वावरणाऱ्या नागरीकांवर कारवाई केली जात असून गेल्या दहा  दिवसात अशा 1131 व्यक्तींकडून 5 लाख 64 हजार 900 रुपये इतका दंड वसूल केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. (KDMC action on unmasked citizens, imposes fines of over Rs 5.5 lakh)

1 मार्च ते 10 मार्च या कालावधीत मास्कचा वापर न करता बाजारपेठ, मॉल येथे फिरणाऱ्या, प्रवास करणाऱ्या तसेच इतर ठिकाणीही फिरणाऱ्यांवर पालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. अशा लोकांवर पालिका प्रशासन करडी नजर ठेवत  असून त्यांच्याकडून थेट दंड वसूल करण्यात येत आहे. सध्‍याचा काळ हा लग्न सराईचा असल्यामुळे, बाहेर विशेषत: गर्दीच्या ठिकाणी कुठल्याही समारंभात वावरतांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरतांना अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

कोरोना रुग्ण अपडेट (गुरुवार) -
आजची एकूण रुग्णसंख्या - 264 

कल्याण पूर्व -  46
कल्याण पश्चिम -65
डोंबिवली पूर्व -100
डोंबिवली पश्चिम -42 
मांडा   टिटवाळा -11

आज डिस्चार्ज झालेले रुग्ण - 168
 मृत्यू - 1 
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण - 2455
एकूण डिस्चार्ज झालेले रुग्ण - 62064
 

 

Web Title: KDMC action on unmasked citizens, imposes fines of over Rs 5.5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.