केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी
By मुरलीधर भवार | Published: September 23, 2023 04:31 PM2023-09-23T16:31:44+5:302023-09-23T16:32:30+5:30
नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे तेथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कल्याण - कल्याण डोंबिवली परिसरात आज होणारे गणेश आणि गौरींचे विसर्जन सुरळीतरित्या पार पडावे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी आज विसर्जन स्थळांची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
आतिरिक्त आयुक्त चितळे यांनी यावेळी ब प्रभागातील परिवहन डेपो जवळील गणेश विसर्जन स्थळाची पाहणी केली. सहाय्यक आयुक्तांना सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता राखणे बाबत सूचना केल्या. या ठिकाणी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे तेथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अतिरिक्त आयुक्त चितळे यांनी कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली जवळील विद्यापीठ परिसरातील कृत्रिम तलावाची, डोंबिवलीतील निळजे नदीकाठी असलेल्या विसर्जन स्थळ, डोंबिवलीच्या आय प्रभागातील रीजन्सी अनंतम येथे बनविलेल्या कृत्रिम तलावाची, देसाई खाडी परिसरातील विसर्जन स्थळाची त्याचप्रमाणे डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव तलाव , डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव रेतीबंदर विसर्जन घाटाची पाहणी केली. गणेशआणि गौरींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडावे, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी विसर्जन स्थळाजवळील रस्त्यांवर पाण्याची डबकी तयार होणार नाहीत याची काळजी घेणे बाबत देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.