KDMC: सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेचा केडीएमसीवर धडक मोर्चा
By मुरलीधर भवार | Published: December 16, 2022 04:07 PM2022-12-16T16:07:19+5:302022-12-16T16:07:37+5:30
KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा गाडय़ा काम करणा:या सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा गाडय़ा काम करणा:या सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर, दत्तात्रय कोळेकर, सुलतान पटेल, अशोक सापटे, दशरथ भालके, संगीता भोमटे, महेंद्र निरगुडा, प्रवीण मेटकर,सागर सोनवणो, नितीन काळण, अमित साळवे, मयूर जाधव आदी आदिवासी महिला आणि सफाई कामगार सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून महापालिका मुख्यालयार्पयत हा मोर्चा काढण्यात आला. श्रमजीवी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांची भेट घेतली.
महापालिकेत कचरा उचलण्याच्या गाडय़ांवर ३०० सफाई कामगार आणि १५० कचरा गाडय़ावरील चालक आहेत. या कामगारांना या आधीचा ठेकेदार विशाल इंटरप्रायङोस हा किमान वेतनानुसार पगार देत नव्हता. त्यानंतर महापालिकेने कचरा गाडय़ांचा ठेकेदार बदलला. आत्ता आर अॅण्ड डी आणि सेक्यअर सेक्यूरीटी या दोन ठेकेदारांना कामे दिली आहे. राज्य सरकारच्या २०१७ सालच्या सरकारी अध्यादेशानुसार सफाई कामगारांना किमान वेतन दिले पाहिजे. सरकारच्या या अध्यादेशाची महापालिकेच्या प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात नाही. महापालिका ठेकेदाराकडे बोट दाखविते. ठेकेदाराकडून मनमानी केली जात आहे. त्यात सफाई कामगार भरडला जात आहे. किमान वेतन दिले जात नाही. गणवेश, गमबूट, हातमोजे, ओळखपत्र दिले जात नाही. या सगळया मुद्यावर उपायुक्त पाटील यांच्यासोबत शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी उपायुक्तांनी या प्रकरणी येत्या मंगळवारी संबंधित ठेकेदाराला नोटिस काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.