KDMC नं कंत्राटदाराला टाकलं काळ्या यादीत; अनामत रक्कमही जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 09:11 PM2022-03-28T21:11:14+5:302022-03-28T21:11:34+5:30
कंत्राटदार कंपनीकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नसल्यानं १ लाख ५४ हजार रुपयांची अनामत रक्कमही केली जप्त
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने चिन्मय इंटरप्रायझेस या कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. या कंपनीची सुरक्षा अनामत रक्कम एक लाख ५४ ह जार रुपये जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कंपनी नवी मुंबईची असून ही कारवाई महापालिका उपायुक्त पल्लवी भागवत यांनी केली आहे.
कल्याण स्टेशन परिसरात बोरगावकर वाडी वाहन तळ आहे. हे वाहन तळ चालविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्याला मिळालेल्या प्रतिसादानुसार चिन्मय इंटरप्रायझेस कंपनीचा उच्चतम दर स्विकारला होता. त्याला काम मंजूर करण्यात आले होते. १५ फेब्रुवारी रोजी त्याला स्विकृती पत्र दिले गेले. त्यानंतर पुन्हा अंतिम पत्र २८ फेब्रुवारी रोजी दिले गेले. कंत्राटदार कंपनीकडून कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही. त्याने पुढील कागदपत्रे आणि करारनामा करण्याची प्रक्रिया पार न पाडता महापालिकेचा वेळ वाया घालविला त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले. या कारणास्तव महापालिकेने कंत्राटदाराल काळ्या यादीत टाकून अन्य महापालिकांनी त्याला काम देऊन असे नोटिसमध्ये म्हटले आहे.
सध्या स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केल जात आहे. त्यासाठी स्टेशन परिसरातील वाहन तळ पाडला आहे. काम सुरु असल्याने वाहनत कोडी होते. वाहने पार्क करण्यासाटी स्टेशन परिसरात बोरगावकर वाडी वाहन तळ आहे. त्यासाठीच निविदा मागवून वाहन पार्किंगची सुविधा व्हावी. वाहन चालकांची गैरसोय टाळण्याकरीता महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. आत्ता कंत्राटदारालाच काळ्या यादीच टाकल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया नव्याने राबविणार आहे. त्यात पुन्हा वेळ खर्ची होणार आहे.