आरटीआय कार्यकर्त्याला घाबरुन केडीएमसीने शाळेचे शौचालय तोडले
By मुरलीधर भवार | Published: February 15, 2024 07:02 PM2024-02-15T19:02:17+5:302024-02-15T19:02:28+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उर्दू शाळेला शौचालय नसल्याने एका माजी नगरसेवकाच्या पूढाकाराने शौचालय बांधण्यास सुरुवात केली.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उर्दू शाळेला शौचालय नसल्याने एका माजी नगरसेवकाच्या पूढाकाराने शौचालय बांधण्यास सुरुवात केली. मात्र या शौचालयाची तक्रार एका आरटीआय कार्यकर्त्याने केली. त्या बदल्यात पैशाची मागणीही केली. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी आरटीआय कार्यकर्त्याला घाबरुन बांधण्यात येणारे शौचालयच तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कल्याण पूर्वेतील पत्रीपूलानजीक महापालिकेची गफूर डोन ही उर्दू माध्यमाची शाळा आहे. या शाळेतील शाैचालयाची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. या शाळेपासून काही अंतरावर सार्वजनिक शौचालय आहे. मात्र शाळा कल्याण शीळ रस्त्यालगत आहे. विद्यार्थी लांब कसे जाणार. ही समस्या लक्षात घेता माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी त्यांचे सहकाऱ्यास सांगून विद्यार्थ्यांची गैरसाेय दूर करण्याकरीता शौचालय बांधण्यास सांगितले. सादीक शेख यांनी शौचालयाचे काम सुरु केले. शौचालयाचे बांधकाम सुरु असताना एका आरटीआय कार्यकर्त्याने तक्रार केली. तक्रार मागे घेण्यासाठी एक रक्कम ठरली. तक्रारदाराला पैसे मिळाले नसल्याने त्याने शौचालयावर कारवाई करण्यासाठी तगादा सुरु ठेवला.
महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी शौचालयाचे बांधकाम जेसीबी लावून पाडून टाकले. आरटीआय कार्यकर्त्याला धाबरुन महापालिका प्रशासनाची कारवाई महापालिकेचे हासं करुन घेणारी ठरली असल्याचा आरोप अधिकारी वर्गावर आयुक्तांचा कोणताही वचक नसल्याचे यातून दिसू येत असल्याचे माजी नगरसेवक शिंदे यांनी सांगितले. या कारवाईच्या विरोधात नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.