केडीएमसी आयुक्त अन् पोलिस उपायुक्तांनी घेतली कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 03:36 PM2021-02-09T15:36:01+5:302021-02-09T15:36:07+5:30

लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी आज आयुक्त सूर्यवंशी आणि पोलिस उपायुक्त पानसरे यांनी लस घेतली.

KDMC Commissioner and Deputy Commissioner of Police took corona vaccine | केडीएमसी आयुक्त अन् पोलिस उपायुक्तांनी घेतली कोरोनाची लस

केडीएमसी आयुक्त अन् पोलिस उपायुक्तांनी घेतली कोरोनाची लस

Next

कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी आज महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात कोरोनाची लस घेतली.

कोरोनाची लस उपलब्ध होताच महापालिकेने चार लस केंद्रातून सगळ्य़ात प्रथम आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि वॉडबॉय यांच्या लसीकरणास सुरुवात केली होती. पहिल्या टप्प्यातील जवळपास 98 टक्के लसीकरण झालेले आहे. दुस:या टप्प्यात फ्रंट लाईनवरील कर्मचारी आणि अधिकारी वर्गास पोलिस कर्मचा:यांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. फ्रंट लाईन वर्कर्सने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.

लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी आज आयुक्त सूर्यवंशी आणि पोलिस उपायुक्त पानसरे यांनी लस घेतली. या प्रसंगी आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले की, फ्रंट लाईनचे ५ हजार २०० कर्मचारी अधिकारी वर्गास लस दिली जाणार आहे. तसेच १२०० कर्मचा:यांना लस दिली जाणार आहेत.

पोलीस उपायुक्त पानसरे यांनी सांगितले की, कोरोनाची लस आज मी घेतली आहे. आमच्या खात्यातील सगळे पोलिस आणि अधिकारी कोरोनाची लस घेणार आहेत. सगळयांनी स्वत:हून पुढे येऊन लस घ्यावी असे आवाहन केले आहे. या प्रसंगी सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील आदी उपस्थित होते.

Web Title: KDMC Commissioner and Deputy Commissioner of Police took corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.