संयुक्त पथक तयार करुन वाहतूक धोरण ठरवा- केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़

By मुरलीधर भवार | Published: January 31, 2024 08:16 PM2024-01-31T20:16:52+5:302024-01-31T20:17:37+5:30

केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांच्या अधिकारी वर्गास सूचना

KDMC Commissioner Dr. Indurani Jakhar's says form a joint team and decide the transport policy | संयुक्त पथक तयार करुन वाहतूक धोरण ठरवा- केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़

संयुक्त पथक तयार करुन वाहतूक धोरण ठरवा- केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़

कल्याण- स्टेशन परिसरात रिक्षांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते, त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे, तसेच वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, वाहतुक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक बनवुन पार्किंग पी वन, पी टू रिक्षा स्टॅन्ड याबाबत धोरण ठरविण्यात यावे. जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांनी संबंधित अधिकारी वर्गास दिल्या आहेत.

कल्याण डोंबिवली परिसरात वाढत्या गरजेच्या अनुषंगाने सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे जाळे सक्षम करणे, वाहतुक कोंडी कमी करणे, पार्किंग धोरण, सिग्नल यंत्रणा या विषयावर स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत बोलताना आयुक्त जाखड़ यांनी उपरोक्त सूचना केली. यावेळी शहर वाहतुक ठाणेचे पोलीस उपायुक्त डॉ. विजय राठोड, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मध्य रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक, वाहतुक व्यवस्था, आरटीओचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

शहरातील सिग्नल यंत्रणा सुरळीतरित्या कार्यान्वित ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांनी आपसात समन्वय ठेवावा. जास्त प्रमाणात वाहतुक कोंडी होणा-या ठिकाणी सिग्नलसाठी वेळेचे स्लॉट ठरवुन द्यावेत, अशाही सूचना आयुक्त यांनी केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी मुख्यत: मार्केट परिसरात पे ॲन्ड पार्क योजना चालु करावी, अशी सूचना ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त डॉ.विजय राठोड यांनी केली आहे.. पोलीस विभागाने यासाठी संबंधित परिसर निश्चित करुन द्यावा, जेणेकरुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे आदेश महापालिका आयुक्त जाखड़ यांनी दिले.
 

Web Title: KDMC Commissioner Dr. Indurani Jakhar's says form a joint team and decide the transport policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण