केडीएमसी आयुक्तांनी केली उल्हास नदीची पाहणी; जलपर्णी रोखण्यासाठी उपाययोजना करणार
By मुरलीधर भवार | Published: March 9, 2023 07:39 PM2023-03-09T19:39:00+5:302023-03-09T19:39:30+5:30
गॅबियन बंधारे आणि बायाे सॅनिटायझर इकाे चीपचा वापर करणार, सीएसआर फंडातून काम केले जाईल
कल्याण-महत्वाचा आणि सगळ्य़ात मोठा बारमाही पाण्याचा जलस्त्रोत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्यावर जलपर्णी उगलविल्याने ती दूर करण्यासाठी आज सायंकाळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पाहणी केली.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि जलपणी उगवू नये याकरीता पाठपुरावा करणारे मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी याबाबत नुकतीच जिल्हाधिका:यांची भेट घेतली होती. या प्रकरणी आयुक्तांचीही भेट घेतली होती. आयुक्तांनी गुरुवारी पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज सायंकाळी आयुक्तांनी पाहणी केली. या वेळी निकम यांच्यासह जागरुक नागरीक फाऊंडेशनचे प्रमुख श्रीनिवास घाणेकर यांच्यासह माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि उमेश बोरगावकर, प्रशांत मोरे, दिलीप पाटील, महापालिकेचे अभियंता घनश्याम नवांगूळ आणि प्रमोद मोरे जलतज्ञ गुणवंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते. नदी पात्रत मोहने, गाळेगाव आणि म्हारळ हे ३ नाले येऊन मिळतात. त्यांच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होते. नदीच्या पाण्यावर जलपर्णी उगविते.
ही समस्या दरवर्षीची आहे. ती कायम स्वरुपी दूर करण्यासाठी आज पुन्हा पाहणी करण्यात आली. महापालिकेने मोहने आणि गाळेगाव नाला वळविला आहे. दोन एसटीपी प्लांट तयार केले आहे. त्यात ५० टक्केच प्रक्रिया केली जात आहे. नदी पात्रत काही ठीकाणी गॅबीयन बंधारे बांधून त्यात बायो सॅनिटाईझर इको चीप टाकण्यात यावी. गॅबीयन बंधारे बांधण्याकरीता सीएसआर फंड घेऊन काम केले जाईल. म्हारळ नाल्याबाबत जिल्हा परिषदेशी संपर्क साधून त्याचे काम मार्गी लावण्याकरीता महापालिका पाठपुरावा करणार असल्याचे आयुक्तांनी आश्वासित केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"