साडे सात काेटीच्या रस्ते प्रस्ताव प्रकरणी केडीएमसी आयुक्तांनी १५ जणांना बजावली कारणे दाखवा नाेटिस
By मुरलीधर भवार | Published: April 11, 2023 03:19 PM2023-04-11T15:19:09+5:302023-04-11T15:20:18+5:30
आयुक्तांच्या लक्षात आल्याने राेखला गेला भ्रष्टाचार
कल्याण- कल्याण डाेंबिवलीतील सावळा गेांधळ पुन्हा एकदा समाेर आला आहे. महापालिकेच्या अर्थ संकल्पात निधीची तरतूद नसताना सुस्थित असलेल्या रस्त्यांच्या सिमेंट काॅन्क्रीटीकरणाकरीता साडे सात काेटीचे प्रस्ताव तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समाेर आली आहे. ही बाब आयुक्तांच्या लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी १५ जणांना कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात आली आहे. हा प्रकार उघड आल्यावर या फाईल गहाळ करण्याचा प्रकार घडला हाेता. फाईल गहाळ हाेणे हे याच प्रकरणाशी संबंधित असल्याचेही समाेर आले आहे.
महापालिका प्रशासन नेहमीच भ्रष्टाचाराच्या कारणावरुन चर्चेत राहिले आहे. आत्तापर्यंत विविध खात्यातील कर्मचारी अधिकारी हे लाच घेताना पकडले गेले आहेत. ४० पेक्षा जास्त अधिकारी लाच घेताना लाच लुचपत खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. शहराच्या पश्चिम भागातील म्हसाेबा मैदान आणि फडके राेड परिसरातील रस्ते सुस्थितीत असताना या रस्त्याचे काॅन्क्रीटीकरण करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले. हे प्रस्ताव साडे सात काेटी रुपये खर्चाचे हाेते. महापालिकेच्या अर्थ संकल्पात निधीची तरतूद नसताना हे प्रस्ताव कसे काय तयार केले गेले ही बाब महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची विचारणा सुरु केली. हा प्रकार लक्षात आल्यावर भ्रष्टाचाराचे बिंग फूटणार या भितीपाेटी या प्रस्तावाच्या पाच फाईल गहाळ झाल्या हाेत्या. सामान्य प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्या दालनातून गहाळ झालेल्या फाईल दुसऱय्ाच विभागात सापडल्या.
या प्रकरणी एका शिपायाला निलंबीत करण्याची कारवाई करण्यात आली. मात्र शिपायाला या प्रस्तावाची फाईल गहाळ करण्यास कुणे भाग पाडले त्याच्या विराेधातही कारवाई केली जाणे अपेक्षित आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्त दांगडे यांनी १५ जणांना कारणे दाखवा नाेटिस बजावली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून काय खुलासा केला जाताे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. खाेटे प्रस्ताव तयार करण्यात आले हाेते. हे यातून उघड झाले आहे. त्यामुळे हे प्रस्ताव काेणाच्या सांगण्यावरु तयार केले गेले याची शाेध घेऊन त्यांच्या विराेधात कारवाई केल्यावर या प्रकाराला आळा बसेल. याच प्रकारे अन्य विभागातून असेच प्रस्ताव तयार केले गेले आहेत याही शाेध आयुक्तांनी घेतला तर अन्य काही असल्यास ते समाेर येऊ शकतात. त्याला आळा घातला जाऊ शकताे.
या प्रकरणी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले की, या प्रकरणातील प्रत्येक फाईल मागे तीन अधिकारी, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ट अभियंता अशा एकूण १५ जणांच्या विराेधात कारणे दाखवा नाेटिस बजावली आहे. अर्थ संकल्पात तरतूद नसताना अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणी चाैकशी सुरु आहे.दरम्यान महापालिका आयुक्तांचे मनसे आमदार राजू पाटील यांनी अभिनंदन केले आहे. या प्रकरणाची एबीसीमार्फत चाैकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी ट्वीट केले आहे.