कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग, आयुक्तांनी दिले कारवाईची आदेश

By मुरलीधर भवार | Published: December 22, 2023 04:24 PM2023-12-22T16:24:09+5:302023-12-22T16:24:47+5:30

या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.

KDMC commissioner's car chased by contract driver, commissioner ordered action | कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग, आयुक्तांनी दिले कारवाईची आदेश

कंत्राटी चालकाकडून केडीएमसी आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग, आयुक्तांनी दिले कारवाईची आदेश

कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करने पालिकेच्या एका कंत्राटी वाहन चालकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी या कर्मचाऱ्यांची चौकशी करत संबंधित विभागास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही अधिकारी बचावात्मक पवित्रा घेत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी चौकशी करत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले.

आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ््या कंत्राटी चालकाचे नाव धर्मेंद्र सोनवणे असे आहे .पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांचा काल केडीएमसीच्या अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात पाहणी दौरा करण्यासाठी निघाल्या. या दौऱ्या दरम्यान आयुक्त जाखड यांच्या गाडीचा धर्मेंद्र सोनवणे या कंत्राटी चालकाने दुचाकीने पाठलाग पाठलाग करीत होता. .ही बाब लक्षात येताच आयुक्तांनी त्याच्या गळ्यात असलेले आय कार्ड पाहिले. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करत सोनवणे यांची चौकशी केली. त्यांनी संबंधित विभागाला सोनवणे याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे .या प्रकरणाची चौकशी करत योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपायुक्त अर्चना दिवे यांनी सांगितले. आयुक्त नेमक्या कोणत्या परिसरात जात आहेत हे पाहण्यासाठी धर्मेंद्र सोनवणे हा आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करत होता. 

याबाबत सोनवणे कोणाला तरी माहिती देत असावा. त्यासाठीच तो पाठलाग करीत होता. हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. अ प्रभाग कार्यालय क्षेत्रात अनधिकृत बांधकाम सुरू आहेत . महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे बेकायदा बांधकामधारकांचे धाबे दणाणले होते .आयुक्त यांच्या दौऱ्या आधीच सगळे सुस्थितीत असल्याचे भासविण्याकरीता कंत्राटी चालकाने आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्याची माहिती त्याला कोणाला तरी द्यायची होती असे बोलले जात आहे. हा कामगार कंत्राटी असल्याने त्यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: KDMC commissioner's car chased by contract driver, commissioner ordered action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.