रस्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केडीएमसीने घेतली अभियंत्यांची कार्यशाळा
By मुरलीधर भवार | Published: October 28, 2022 04:09 PM2022-10-28T16:09:17+5:302022-10-28T16:09:43+5:30
महापालिका हद्दीत ३७० किलोमीटरचे रस्ते आहे. या रस्त्यावर जोरदार पावसामुळे खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी नागरीकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात.
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम दज्रेदार पद्धतीने होण्यासाठी आज महापालिका मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात अभियंत्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस राज्य सरकारचे माजी अधिक्षक अभियंता राम कणीकर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळे संदर्भात शहर अभियंता अर्जून अहिरे यांनी सांगितले की, महापालिका हद्दीत आत्ता चार हॉटमिक्सचे प्लांट सुरु आहे. या हॉट मिक्समधून ज्या निकषांनुसार आवश्यक तपमान असलेला हॉटमिक्सचा माल आला पाहिजे. साईटवर खडी आणि हॉटमिक्सचा वापर करताना अभियंत्यांनी त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. प्रत्यक्ष साईटवर अभियंत्यांनी काय काम केले पाहिजे याची माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून अभियंत्यांना देण्यात आली. कल्याण डोंबिवलीसह राज्यातील रस्ते चांगले असले पाहिजे याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जातीने लक्ष ठेवून आहे. त्यांच्या आदेशानुसार कामात गुणवत्ता असली पाहिजे. जोरदार पावसामुळे रस्त्याचा बेस खराब झाला आहे. त्याठिकाणी खड्डे बुजविताना काय काळजी घेतली पाहिजे. जेणे करुन एखादा खड्डा बुजविल्यावर त्याठिकाणी लगेच खड्डा पडता कामा नये. तो उखडून जाता कामा नये अशा विविध विषयावर या कार्यशाळेतून भर देण्यात आला.
महापालिका हद्दीत ३७० किलोमीटरचे रस्ते आहे. या रस्त्यावर जोरदार पावसामुळे खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यासाठी नागरीकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात. दिवाळीच्या काळात महापालिकेने केडीएमसी ऑन डय़ूटी २४ तास हे अभियान राबविले. या अभियानांतर्गत शहरातील रस्त्यावरील ७० टक्के खड्डे बुजविण्याचे काम मार्गी लागले असून उर्वरीत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे ३० टक्के काम अद्याप शिल्लक असून ते देखील लवकर मार्गी लावले जाईल. त्यातही दर्जा राखला जाईल असे शहर अभियंता अहिरे यांनी सांगितले.
दिवाळीच्या तोंडावर डोंबिवली ब्राह्मण सभा रस्त्यावर खड्डे बुजविण्याच्या कामाला शहर अभियंते अहिरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली होती. त्यावेळीच त्यांनी लिमिटेड काम करणा:या अभियंत्यांची चांगलीच कानउघडणी केली होती. यावेळी त्यांच्या कामाचे कौतूक बाळासाहेबांची शिवसेना युवा पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी केले होते. त्यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार केडीएमसी ऑन डय़ूटी २४ तास हे अभियान राबविले होते.