केडीएमसीचे अग्निशमन दल अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज; ताफ्यात ५५ मीटरची उंच शिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 01:25 AM2020-11-29T01:25:25+5:302020-11-29T01:25:35+5:30

७० मीटर उंच शिडी घेण्याचा प्रस्ताव, मनपा हद्दीतील आगीच्या घटनांचा साप्ताहिक अहवाल दरमहिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जातो.

KDMC fire brigade equipped with state-of-the-art facilities; 55 meter high ladder in the convoy | केडीएमसीचे अग्निशमन दल अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज; ताफ्यात ५५ मीटरची उंच शिडी

केडीएमसीचे अग्निशमन दल अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज; ताफ्यात ५५ मीटरची उंच शिडी

Next

मुरलीधर भवार

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील शहरीकरण वाढत असून, उंच इमारती उभ्या राहत आहेत. औद्योगिक कारखान्यांच्या दोन वसाहती, शाळा, कॉलेज, रुग्णालये असा भला मोठा परिसर आहे. मनपा क्षेत्रात कल्याण जंक्शन हे मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक तसेच आठहून जास्त स्थानके येतात. मनपा क्षेत्राचा हा विचार करता मनपाचे अग्निशमन दल सज्ज आहे.

अग्निशमन दलाकडे पुरेसा कर्मचारीवर्ग आणि साधनसामग्री आहे. मनपा हद्दीत आजमितीस चार अग्निशमन केंद्रे आहेत. तसेच अन्य एक अग्निशमन केंद्र टिटवाळा परिसरात उभारले जात आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यावर त्यासाठी कर्मचारीवर्गाची गरज लागणार आहे. केडीएमसीचे अग्निशमन दल केवळ मनपा क्षेत्रातील नागरिकांसाठी काम करत नाही, तर गरज भासल्यास अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी धाव घेत असते. चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा अग्निशमन दलाचा प्रयत्न असतो.

पुरेसे कर्मचारी 
महापालिका हद्दीत चार अग्निशमन केंद्रे आहेत. त्यात ११९ कर्मचारी कार्यरत आहे. टिटवाळा येथे आणखीन एक केंद्र उभारले जात आहे. त्यासाठी कर्मचारी लागणार आहेत. त्यांची भरती लवकरच केली जाईल. त्यामुळे सद्य:स्थितीत कर्मचारीवर्गाची वानवा नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

आगीच्या ३५० घटना
मनपा हद्दीतील आगीच्या घटनांचा साप्ताहिक अहवाल दरमहिन्यात स्थायी समितीच्या बैठकीत सादर केला जातो. मनपा हद्दीत वर्षभरात लहानमोठ्या ३५० पेक्षा जास्त आगीच्या घटना घडतात. ऑक्टोबरमध्ये एक इमारत कोसळली होती. तसेच मेट्रो पोलिटीयन कंपनीत एक भीषण आग लागल्याची घटना होती.

अत्याधुनिक साहित्य
अग्निशमन दलाकडे ५५ मीटर उंचीची अत्याधुनिक शिडी असून, त्याद्वारे सतराव्या मजल्यापर्यंत पोहोचता येते. आगीच्या घटनेत उंच मजल्यावर अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी या शिडीचा उपयोग होतो. ७० मीटर उंचीची शिडी घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आहे. प्रशासनाची मान्यता मिळताच ही शिडी घेतली जाईल. 

 मनपा हद्दीत आणखीन सात ठिकाणी अग्निशमन केंद्रे हवी आाहेत. मात्र, ते भविष्यासाठी नियोजन असेल. सध्याची अग्निशमन केंद्रे ही पुरेशी आहेत. नव्या केंद्रानुसार आणखीन १०० कर्मचारी लागू शकतात. सध्या पुरेसे मनुष्यबळ, साधनसामग्रीच्या जोरावर अग्निशमन दलाचे कर्मचारी योग्य प्रकारे त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. - दिलीप गुंड, मुख्य अग्निशमन अधिकारी

Web Title: KDMC fire brigade equipped with state-of-the-art facilities; 55 meter high ladder in the convoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.