मतदान जनजागृतीसाठी केडीएमसीची भव्य बाईक रॅली
By मुरलीधर भवार | Published: May 10, 2024 08:43 PM2024-05-10T20:43:17+5:302024-05-10T20:43:50+5:30
शहर अभियंत्या झाल्या आयुक्तांच्या सारथी.
कल्याण-मागच्या लोकसभा निवडणूकीत कल्याण लोकसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी राज्यात खालून पहिली होती. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून जनजागृती केली जात आहे. आज कल्याणमध्ये काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती बाईक रॅली महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड सहभागी झाल्या होत्या. बाईक चालविण्याचे काम शहर अभियंत्या अनिता परदेशी यांनी केले. तर त्यांच्या मागच्या सीटवर आयुक्त बसल्या होत्या.
कल्याण मधील दुर्गा माता चौक येथून भव्य अशा बाईक रॅली काढण्यात आली दुर्गाडी चौक-लाल चौकी-सहजानंद चौक-शिवाजी महाराज चौक-पत्री पुल-मेट्रो मॉल-चक्की नाका-तिसगाव नाका-काटेमानिवली ब्रीज-वालुधनी ब्रीज -मुरबाड रोड-प्रेम ऑटो-बिर्ला कॉलेज रोड-खडकपाडा सर्कल-साईचौक-बारावे चौक डावीकडे वळून-वसंतव्हॅली मार्गे-आरओऑफीस या ठिकाणी रॅलीची सांगता झाली.