महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची डोंबिवलीत सरप्राईज व्हिजीट
By अनिकेत घमंडी | Published: June 19, 2024 06:52 PM2024-06-19T18:52:07+5:302024-06-19T18:52:29+5:30
शासनाच्या कृती आराखडा नुसार रेल्वे स्थानक परिसराची केली पाहणी
डोंबिवली : शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सरप्राईज व्हिजीट दिल्याने प्रभाग अभियंते, शहर अभियंता आदींची धावपळ झाली. त्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील पाटकर प्लाझा, चिमणी गल्ली, आदित्य मंगल कार्याजवळील महापालिकेच्या शाळेची धोकादायक इमारत या ठिकाणीची पाहणी केली. शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी उपाय करू यावर लवकरच संबधित विभागतील अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेणार असल्याचे म्हंटले.
शासनाचा कृती आरखडा अंतर्गत पाहणी करण्यात आल्याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यावेळी शहर अभियंता रोहिणी लोकरे, सहायक आयुक्त चंद्रकांत जगताप, संजय कुमावत आदी उपस्थित होते. शहरातील समस्यांबाबत काही नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली. त्याबाबत आयुक्त जाखड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शासनाच्या कृती आराखडा अंतर्गत डोंबिवलीत पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. डोंबिवली मधील पाटकर प्लाझा तसेच पालिकेच्या विभागीय कार्यालया जवळील पालिकेची धोकादायक शाळेची नवीन इमारत बांधणी करून सहायक आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.