KDMC महापालिकेकडून २०० अतिक्रमणावर निष्कासनाची धडक कारवाई

By अनिकेत घमंडी | Published: October 26, 2023 05:26 PM2023-10-26T17:26:03+5:302023-10-26T17:26:11+5:30

महापालिकेच्या "9/आय" प्रभागात रस्त्यालगतच्या अतिक्रमणावर कारवाई

KDMC Municipal Corporation eviction action on 200 encroachments | KDMC महापालिकेकडून २०० अतिक्रमणावर निष्कासनाची धडक कारवाई

KDMC महापालिकेकडून २०० अतिक्रमणावर निष्कासनाची धडक कारवाई

डोंबिवली:  कल्याण पूर्व येथील चिंचपाडा कमान ते डी.एस.एम शाळेपर्यंत एमएमआरडीएच्या माध्यमातून होणा-या 9.00 मीटर रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई गुरुवारी करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार "9/आय" प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी  केली. या मध्ये अतिक्रमण केलेल्या टप-या, शेड, भंगाराची  दुकाने, बाधित होणा-या पाय-या, ओटे अशी एकूण 200 अतिक्रमण काढण्यात आली.
सदर निष्कासनाची कारवाई 1 हायड्रा, 1 जेसीबीच्या सहाय्याने तसेच 10 कामगार, ड व आय प्रभागातील अनाधिकृत नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी यांचे मदतीने करण्यात आली. या कामी चिंचपाडा गावातील नागरिकांनी देखील महापालिकेस सहकार्य केले. सदर कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याची माहिती हेमा मुंबरकर यांनी दिली

Web Title: KDMC Municipal Corporation eviction action on 200 encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.