केडीएमसीने नागरिकांना मुदतीत दर्जेदार सेवा देण्यासाठी १०७ सेवा केल्या अधिसूचित

By मुरलीधर भवार | Published: August 11, 2023 05:39 PM2023-08-11T17:39:37+5:302023-08-11T17:39:56+5:30

सरकारने अधिसुचित केलेल्या ५८ सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आदेशान्वये संपूर्ण महापालिकेमार्फत देण्यात येत आहेत.

KDMC notified 107 services to provide timely quality services to citizens | केडीएमसीने नागरिकांना मुदतीत दर्जेदार सेवा देण्यासाठी १०७ सेवा केल्या अधिसूचित

केडीएमसीने नागरिकांना मुदतीत दर्जेदार सेवा देण्यासाठी १०७ सेवा केल्या अधिसूचित

googlenewsNext

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेने १०७ सेवा अधिसूचीत केल्या आहे. या सेवा नागरीकांना मुदतीत आणि दर्जेदार दिल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.

सरकारने अधिसुचित केलेल्या ५८ सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आदेशान्वये संपूर्ण महापालिकेमार्फत देण्यात येत आहेत. महानगरपालिकेने स्वत:हून आणखी ४९ सेवा नागरीकांच्या सेवेकरीता अधिसूचित केलेल्या आहेत. त्यामुळे विशिष्ट कालावधीमध्ये नागरीकांना सेवा देणे बंधनकारक आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सरकारी आदेशानुसार २०१५ साली १५ सेवा अधिसूचित केल्या होत्या. त्यानंतर जून २०२३ मध्ये १२ सेवा आणि महापालिकेकडील ५ सेवा अशा १७ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारकडील ३१ सेवा आणि महापालिकेकडील ४४ सेवा अशा एकूण १०७ लोकसेवा आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना पुरविण्यात येत आहेत.

या सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करणारे पदनिर्देशित अधिकारी तसेच ती सेवा विहीत मुदतीत न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रथम अपिलिय अधिकारी आणि द्वितीय अपिलीय अधिकारी यांची नियत कालमर्यादा अधिसुचित करण्यात आली आहे. शासन निर्णयातील निर्देशानुसार या नागरी सेवांचे कामकाज प्राधान्याने हाताळावयाचे असल्याने याबाबतचे गांर्भीय लक्षात घेवून, तात्काळ कार्यवाही करणेबाबत सर्व संबंधितांनी खबरदारी घ्यावी. कर्तव्यपूर्ती न करणा-या पदनिर्देशित अधिकारी हे अध्यादेशातील तरतुदीनुसार व्यक्तिश: जबाबदार राहतील. अशा पदनिर्देशित जबाबदार अधिका-यांविरुध्द्व संबंधित प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी अधिसूचनेतील तरतुदीनुसार यथायोग्य कायदेशीर कार्यवाही पार पाडावी, असे आदेश आयुक्त दांगडे यांनी काढले आहेत.

Web Title: KDMC notified 107 services to provide timely quality services to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.