गणेशोत्सवासाठी केडीएमसी सज्ज; गणपतीसाठी ऑन कॉल विसर्जन सुविधा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2022 10:40 AM2022-08-30T10:40:35+5:302022-08-30T10:40:43+5:30

महापालिकेने दिलेल्या नंबरवर फोन केल्यास पालिकेचे पथक घरी जाणार , गणपती घेवून कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन केले जाणार आहे.

KDMC ready for Ganeshotsav; On call immersion facility available for Ganpati | गणेशोत्सवासाठी केडीएमसी सज्ज; गणपतीसाठी ऑन कॉल विसर्जन सुविधा उपलब्ध

गणेशोत्सवासाठी केडीएमसी सज्ज; गणपतीसाठी ऑन कॉल विसर्जन सुविधा उपलब्ध

Next

कल्याण - काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठीकल्याण डोंबिवली महापालिका देखील सज्ज झाली आहे. गणेशउत्सवादरम्यान गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी होवू नये व विसर्जन प्रक्रिया सुरळीत व्हावी या दृष्टिकोनातून महापालिकेने घरगुती गणपतीसाठी ऑन कॉल विसर्जन सुविधा  उपलब्ध करून दिली आहे. तसेच प्रभागात  कृत्रिम तलावाची देखील व्यवस्था केल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. महापालिकेने दिलेल्या नंबरवर फोन केल्यास पालिकेचे पथक घरी जाणार , गणपती घेवून कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन केले जाणार आहे.

महापालिका परिसरातील प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या किल्ले दुगार्डी येथील गणेश घाटाची आज महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, परिमंडळ 3 चे पोलिस उपआयुक्त सचिन गुंजाळ, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी आज पाहणी केली.यावेळी पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी गणेश घाटावर वाहनांच्या पार्किंगसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था केलेली असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे ,गणेश घाट परिसरात महापालिकेच्या  जनरेटर,  हॅलोजन,  सी.सी.टी.व्ही कॅमेरे ची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले

Web Title: KDMC ready for Ganeshotsav; On call immersion facility available for Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.