आमच्या धनुष्यबाणावर टीका करू नका, तुमचे रॉकेट जनता कुठे घालेल सांगता येणार नाही

By मुरलीधर भवार | Published: September 18, 2023 04:04 PM2023-09-18T16:04:29+5:302023-09-18T16:06:02+5:30

भाजप आमदाराच्या टिकेला शिवसेनेचे प्रत्युत्तर

kdmc shiv sena replied bjp over criticism | आमच्या धनुष्यबाणावर टीका करू नका, तुमचे रॉकेट जनता कुठे घालेल सांगता येणार नाही

आमच्या धनुष्यबाणावर टीका करू नका, तुमचे रॉकेट जनता कुठे घालेल सांगता येणार नाही

googlenewsNext

मुरलीधर भवार, कल्याण- धनुष्यबाणावर टिका करु नका. तुमचे रॉकेट जनता कोणत्या जागेत घालेल. हे सांगता येणार नाही. आम्हाला गुंड म्हणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे दाखल आहे. त्यांच्या मुलांना जे पोलिस संरक्षण दिले आहे.ते पोलिस वॉचमन सारखे काम करीत आहेत. आमदार गणपत गायकवाड हे युतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत. आम्ही यूती धर्म पाळतो. भाजप आमदारांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करा अशा सडेतोड टिका शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर केली आहे.

कल्याण पूर्व विधानसभेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद संपता संपेना. भाजपच्या पदाधिकारी नियुक्ती सभारंभात भाजप आमदार गायकवाड यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सडेतोड टिका केली. या टिकेला आत्ता शिवसेनेचे शहर प्रमुख गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कुठे अन्याय होत असेल तर षंढ होण्यापेक्षा गुंड व्हा. आम्हाला गुंड म्हणाविणारे आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे दाखल आहे. त्यांच्या दोन मुलाना पोलिस संरक्षण दिले आहे. नाहीत. ते पोलिस वाचमेनसारखे काम करीत आहे. त्याचे उत्तर कोण देणार. केबल फुकट द्यायचे आणि निवडून यायचे हेच आमदारांचे काम आहे. खोटेनाटे आराेप करीत प्रसिद्धी मिळविण्याचा आमदारांचा नेहमी प्रयत्न असतो. गेल्या १५ वर्षात कोणताही विकास झाला नसून फक्त भ्रष्टाचार झाला आहे. कल्याण पूर्वेत डॉ बाबासाहेब आंबडेकर यांचे स्मारक उभारण्याचे ३ वेळा भूमीपूजन केले. अक्षरक्ष: बौद्ध समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. त्याठिकाणी खासदार डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारने स्मारक होत आहे. आमदार सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना फक्त आयते वाढलेले ताट पाहिजे. त्यांचे कतृत्व शून्य आहे, असा आरोप शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी केला आहे.

Web Title: kdmc shiv sena replied bjp over criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.