वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांच्या विरोधात केडीएमसीची कारवाई
By मुरलीधर भवार | Published: December 7, 2023 05:30 PM2023-12-07T17:30:01+5:302023-12-07T17:31:05+5:30
जवळपास १५ हातगाड्यांवर हातोडा चालवून त्या तोडून टाकण्याची कारवाई करण्यात आली.
मुरलीधर भवार,कल्याण: स्टेशन परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज चाैकात वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांच्या विरोधात आज कल्याण डोंबिवली महापालिकेने कारवाई केली. जवळपास १५ हातगाड्यांवर हातोडा चालवून त्या तोडून टाकण्याची कारवाई करण्यात आली.
क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे यांनी ही कारवाई केली. वारतूकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडी चालकांना गाड्या हटविण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यांना वारंवार सूचित करुन देखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
अखेरी आज सहाय्यक आयुक्त सोनवणे यांनी आज धकड कारवाई केली. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि स्टेशन परिसर हा प्रचंड वर्दळीचा परिसर आहे. शिवाय स्टेशन परिसरााच्या विकासाचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दतर्फा खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्या असल्यावर वाहतूकीस अडथळा होताे. वाहतूक कोंडीत त्यामुळे भरच पडते.
महापालिकेने आज कारवाई केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र या कारवाईत सातत्य ठेवले जावे अशी आपेक्षा वाहन चालकांसह पादचारी नागरीकांकडून करण्यात येत आहे.