सौर ऊर्जा क्षेत्रात केडीएमसीची उत्तुंग भरारी, देशातील एकमेव महानगरपालिका ठरली

By मुरलीधर भवार | Published: March 29, 2023 07:02 PM2023-03-29T19:02:25+5:302023-03-29T19:02:59+5:30

या क्षेत्रात काम करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका देशातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे.

KDMC's foray into solar energy sector, | सौर ऊर्जा क्षेत्रात केडीएमसीची उत्तुंग भरारी, देशातील एकमेव महानगरपालिका ठरली

सौर ऊर्जा क्षेत्रात केडीएमसीची उत्तुंग भरारी, देशातील एकमेव महानगरपालिका ठरली

googlenewsNext

कल्याण-एका वर्षात महापालिकेने १ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती करणारे प्रकल्प, विकासकांच्या सहभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात उभारलेले आहेत. अशा प्रकारे या क्षेत्रात काम करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका देशातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे.

महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे आणि शहर अभियंता अर्जून अहिरे, विद्युत विभागाचे कायर्कारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे. महानगरपालिका क्षेत्रात नविन इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे उभारणे २००७ पासून बंधनकारक केलेले आहे. सौर ऊर्जा सयंत्रे उभारल्यानंतरच विकासक यांना इमारतीसाठी नगररचना विभागाकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. २००८ ते २०२१ या कालावधीत १८१९ इमारतींवर १,०७,९७,०८५ लिटर्स प्रतिदिन क्षमतेचे सौर उष्ण जल सयंत्रे विकासकाकडून उभारली आहेत.त्यामुळे महापालिका क्षेत्रातील इमारतीमधील गरम पाणी करणेसाठी वीजेचा भार कमी झाला आहे.

दरवर्षी १८ कोटी वीज युनिटची बचत झाली आहे.सौर ऊर्जा वीज निर्मिती करणारे प्रकल्प उभारुन सौर ऊर्जा ह्या ग्रीन एनर्जी प्राधान्य देण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये नगरविकास विभागाने युनिफाईड विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये अंतर्भाव केलेला आहे.

मागील एक वर्षात महापालिका क्षेत्रात एकूण ६१ इमारतींवर एक मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा निर्माण करणारे प्रकल्प विकासकाकडून उभारणी करुन घेतले आहेत. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामुळे दरवर्षी १४,६०,००० वीज युनिटची निर्मिती होणार आहे. वीज युनिट निर्मितीमुळे इमारतीसाठी आवश्यक उद्वाहन, वॉटर पंप, पॅसेज लाईट, आऊट डोअर लाईट या सामायिक बाबींसाठी आवश्यक वीजेची गरज त्यातून भागविली जाणार आहे. सौर ऊर्जा बाबत महापालिका नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विद्युत विभागाने पथनाट्य तयार केलेले आहे. आतापर्यंत सरकारी कार्यालये, शाळा व विविध ठिकाणी पथनाट्याचे २३ प्रयोग केलेले असून जनजागृतीचे काम सुरु राहणार आहे. नविन इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे आस्थापित करुन घेणेसाठी विद्युत विभागाने प्रभावी कार्यपध्दती तयार केली आहे. .

२०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिका क्षेत्रातील नविन इमारतींवर २ मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा वीज निर्मिती करणारे प्रकल्प विकासकांच्या माध्यमातून उभारण्याचा मानस आहे. नविन आर्थिक वर्षात महापालिकेच्या १६ इमारतींवर सौर ऊर्जा वीज निर्मिती करणारे प्रकल्प बसविण्यात येणार आहेत अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत यांनी दिली.

Web Title: KDMC's foray into solar energy sector,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.