KDMC ची आयडियाची कल्पना; नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात म्हणून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 02:12 PM2021-04-03T14:12:30+5:302021-04-03T14:12:53+5:30
लोकांची मानसिकता बदलण्यासाठी केडीएमसीची अनोखी आयडिया
डोंबिवलीमधून एक वेगळी बातमी समोर येत आहे. नागरिकांनी कचरा रस्त्यावर फेकू नये म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने एक अनोखी शक्कल लढवलीये. कचरा टाकल्या जाणाऱ्या परिसरात रस्त्यावर एक जाळी पसरवून त्यावर छोट्या झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्यात.
डोंबिवली पूर्वेकडील शेलार नाका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक हे रस्त्यावर कचरा टाकत होते. संबंधित ठिकाणी एक कचराकुंडी होती. ही कचराकुंडी पालिकेने हटवलीय असे नागरिकांचे म्हणणे आहे..कुंडी नसल्यामुळे कचरा हा रस्त्यावर टाकला जात होता. मात्र नागरिकांनी घंटागाडीत कचरा टाकणे अपेक्षित असून काही अडचण आल्यास घनकचरा विभागाशी संपर्क साधावा असे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितलय. तसेच लोकांची मानसिकता बदलावी म्हणून अशी युक्ती अंमलात आणलीय असेही ते म्हणाले.