हवेची गुणवत्ता खराब करणाऱ्या बिल्डरांना केडीएमसीच्या नव्या आयुक्तांचा दणका
By मुरलीधर भवार | Published: November 21, 2023 06:01 PM2023-11-21T18:01:10+5:302023-11-21T18:01:43+5:30
नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यांनी बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे.
कल्याण-प्रदूषणामुळे वातावरणातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील हवेची गुणवत्ता खालवली असल्याने ज्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी धूर निर्माण होते. अशा बांधकाम प्रकल्पधारकांनी त्यांच्या साईटच्या भोवती पत्र्यांचे संरक्षण उभारावे असे सांगण्यात आले होते. ज्या बांधकाम प्रकल्पधारकांनी अशा पत्र्यांच्या शेड लावलेल्या नाहीत अशा २५ बिल्डरांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या मुख्यालयापासून नजीक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील साई कृष्णा या बांधका साइटचे बांधकाम बंद केले. नव्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलली असून त्यांनी बिल्डरांना चांगलाच दणका दिला आहे.
मुंबईसह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात हवेची गूणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने मुंबई महापलिकेस चांगलेच फटकारले होते. न्यायालयाने फटकारल्यानंतर विविध महापालिकांनी त्यांच्या स्तरावर बैठका घेतल्या होत्या. ८ नोव्हेंबर रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ.. भाऊसाहेब दांगडे यांनी ऑनलाईन बैठक गेतली होती. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळ हे देखील उपस्थित होते. ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवत किमान ३५ फुट उंच पत्रे उभारले पाहिजेत. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना हिरव्या कापड, ज्यूट शीट, ताडपत्रीने चारही बाजूंनी बंदिस्त करावे. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडिंग आणि अनलोडिंग करताना वॉटर फॉगिंग केले जाईल याची खात्री करावी. त्याठिकाणीची पाहणी करण्याकरीता पथके नेमली होती. ज्या ठिकाणी अंमलबजावणी केली जात नाही. त्याठिकाणची व्हिडीओग्राफी करण्यात यावी असे आदेश दिले होते. आयुक्त दांगडे याची बदली झाली. त्यांच्या बदलीपश्चात नव्या आयुक्त जाखड यांनी या प्रकरणी २५ बिल्डरांना नोटिसा बजावल्या आहे. तसेच छत्रपती शिवाजी
चौकातील साई कृष्णा या बांधका साइटचे बांधकाम बंद केले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी केली आहे.
दरम्यान डोंबिवली पूर्वेतील टंडन रोडवरील तळ अधिक तीन मजल्याची साखरी गणेश सोसायटी या इमारतीचे पुनर्विकासासाठी तोडकाम करताना संबंधितांनी धुळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्याने हे पाडकाम थांबविण्याची कारवाई सहाय्यक आयुक्त आयुक्त सोनम देशमुख यांच्या पथकाने केली आहे. तसेच पाडकाम करणाऱ््यास नोटीस बजाविण्यात आली. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात बांधकाम साहित्याची वाहतुक करणारी जी वाहने वायू प्रदुषण नियंत्रण सूचनांचे पालन करत नसल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जाखड यांनी दिले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागास कळविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण आणि प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.