कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी जमीन अधीग्रहण तातडीने करणार, रेल्वे मंत्रालयाची अंतिम मंजुरी

By अनिकेत घमंडी | Published: February 2, 2023 06:13 PM2023-02-02T18:13:54+5:302023-02-02T18:14:08+5:30

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजूरी दिली असून, जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे.

Land acquisition for Kalyan-Murbad railway will be done immediately. | कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी जमीन अधीग्रहण तातडीने करणार, रेल्वे मंत्रालयाची अंतिम मंजुरी

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी जमीन अधीग्रहण तातडीने करणार, रेल्वे मंत्रालयाची अंतिम मंजुरी

googlenewsNext

डोंबिवली:  कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाने अंतिम मंजूरी दिली असून, जमीन अधिग्रहणाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे. तर ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर मुरबाड रेल्वेमार्गासाठी निविदा काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यातील कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गानंतर दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणे असे दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केले, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मुरबाड हे गाव आहे. मात्र, या गावाला रेल्वे पोचण्याचे स्वप्न १७० वर्षांनंतर पूर्ण होणार आहे. अनेक वर्ष प्रयत्न केले जात होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मुरबाड रेल्वेला हिरवा कंदील मिळाला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेचा प्रस्ताव मंजूर केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेसाठी महाराष्ट्राच्या वाटा उचलण्यास मान्यता दिल्यामुळे रेल्वे प्रकल्प पूर्ण होणार आहे. याबद्दल आपण त्यांचे आवर्जून आभार मानत आहोत, असे केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.

जमीन अधिग्रहणासाठी रेल्वे मंत्रालयाकडून दोन दिवसांत मध्य रेल्वेला पत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. जमीन अधीग्रहण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेची निविदा काढण्यात येईल. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्याचबरोबर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात मुरबाड ते नगर आणि मुरबाड ते पुणेपर्यंत दोन रेल्वेमार्ग मंजूर करण्याची मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली. त्याबाबतही रेल्वेमंत्र्यांनी शाश्वत केले आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
कल्याण व मुरबाड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधींना साथीला घेऊन सुमारे दीड महिन्यांत जमीन अधीग्रहण करण्याचा प्रयत्न आहे. सुमारे ८० टक्के जमीन अधीग्रहीत झाल्यावर निविदा काढता येईल. त्यानंतर काम होईल. मात्र, २०२४ पूर्वी काम सुरू होईल. या मार्गासाठी ९६० कोटी रुपये खर्च असून, राज्य सरकारकडून ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

कल्याण स्टेशनचे सुशोभिकरण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व ठाणे रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर कल्याण जंक्शन रेल्वे स्थानकाचा विमानतळाप्रमाणे विकास व सुशोभिकरणाला मंजुरी मिळावी, यासाठी माझ्याबरोबरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

Web Title: Land acquisition for Kalyan-Murbad railway will be done immediately.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण