मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातील जमीन मालकांना मिळतोय पूर्वीपेक्षा अधिक मोबदला

By मुरलीधर भवार | Published: March 9, 2023 06:59 PM2023-03-09T18:59:24+5:302023-03-09T19:00:27+5:30

मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातील जमीन मालकांना पूर्वीपेक्षा अधिक मोबदला मिळत आहे. 

 Land owners in Mumbai Urja Marg project are getting more compensation than before   | मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातील जमीन मालकांना मिळतोय पूर्वीपेक्षा अधिक मोबदला

मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पातील जमीन मालकांना मिळतोय पूर्वीपेक्षा अधिक मोबदला

googlenewsNext

कल्याण : मुंबईसह आसपासच्या एमएमआर परिसराला अखंड वीज पुरवठ्यासाठी केंद्र सरकारतर्फे मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प राबवताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याच्या दरांमध्येही राज्य सरकारने वाढ केली आहे. तर प्रकल्पाचे काम करताना आणि पूर्ण झाल्यानंतरही सातबाऱ्यावर संबंधित जमीन मालकाच्याच नावे ही जमीन राहणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या ट्रान्समिशन लाईनसाठी टॉवर उभारले जात आहेत. त्या संबंधित जमीन मालकांना राज्य सरकारतर्फे पूर्वीपेक्षा जास्त आर्थिक मोबदला दिला जात आहे. तर केवळ टॉवरच्याच मोबदल्यात वाढ झालेली नसून वीज वाहिनी ज्या जमिनीवरून जाईल त्या जमिनीच्या मोबदल्यातही पूर्वीपेक्षा अधिक वाढ दिली आहे.

कल्याण तालुक्यातील पोई गावासाठी याआधी १ गुंठा जागेसाठी जिथे ९ हजार ८७० रुपये मोबदला जाहीर झाला होता. तो आता नव्या सरकारी निर्णयानुसार सुमारे २ लाख ७० हजार रुपयांच्या घरात पोहचला आहे. तर कल्याण तालुक्यातील ११ गावांसाठीचा नविन मोबदला प्रति गुंठा २ लाख ७० हजारांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. प्रकल्पाच्या कामासाठी सरकार कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करत नसून संबंधित जागेच्या सात बाऱ्यावर मूळ मालकाचेच नाव राहणार आहे.

ट्रान्समिशन लाईनखालील शेतजमिनीवर शेतकरी सर्व प्रकारचा भाजीपालाही पिकवू शकतात. भाजीपाला पिकवण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे इतर ठिकाणी उभारण्यात आलेल्या ट्रान्समिशन लाईनखालील शेतीच्या माध्यमातून समोर आले आहे अशी माहिती उर्जा प्रकल्पाच्या अधिकारी वर्गाकडून देण्यात आली आहे.

 

Web Title:  Land owners in Mumbai Urja Marg project are getting more compensation than before  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण