स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुनच करुयात - डॉ भाऊसाहेब दांगडे

By प्रशांत माने | Published: September 17, 2023 02:30 PM2023-09-17T14:30:27+5:302023-09-17T14:30:55+5:30

इंडियन स्वच्छता लिग अभियानात सहभागी होण्याचे केले आवाहन

let start cleanliness from ourselves said dr bhausaheb dangde | स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुनच करुयात - डॉ भाऊसाहेब दांगडे

स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुनच करुयात - डॉ भाऊसाहेब दांगडे

googlenewsNext

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासुनच करुया, स्वच्छतेचे महत्त्व मनावर बिंबवूया असे प्रतिपादन केडीएमसीचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी केले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत इंडियन स्वच्छता लिग २.० या अभियानांतर्गत रविवारी दुगार्डी गणेश घाट परिसर येथे आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेच्यावेळी ते बोलत होते. आपण स्वच्छता केली तर शहर स्वच्छ राहिल, यासाठी आपण सर्वांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

हे स्वच्छता अभियान दुर्गाडी किल्ला परिसरातील गणेश घाट तसेच डोंबिवली पश्चिम येथील रेती बंदर परिसर आणि डोंबिवली पुर्व येथील ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुल येथे राबविण्यात आले. इंडियन स्वच्छता लीगमध्ये देशातील अनेक शहरे सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमध्ये जे शहर अधिक चांगलं काम करणार आहे त्या शहराला पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्या दृष्टीकोनातून कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छता लीग मध्ये सहभागी व्हावे आणि स्वच्छतेबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी याकडे दांगडे यांनी लक्ष वेधले.

यावेळी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर डॉ प्रशांत पाटील, रुपिंदर कौर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त अतुल पाटील, माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव, शिक्षण अधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.आयुक्त राजेश सावंत, प्रिती गाडे, सुषमा मांडगे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, शालेय विदयार्थी, अनेक सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वच्छतेबाबत तसेच 'माझी वसुंधरा'बाबत शपथ ग्रहण करण्यात आली त्याचप्रमाणे शालेय विदयार्थ्यांनी स्वच्छतेबाबत बहारदार पथनाटयाचे सादरीकरण केले.

Web Title: let start cleanliness from ourselves said dr bhausaheb dangde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.